IND vs AUS ICC World Cup 2023 Highlights | टीम इंडियाचा 6 विकेट्सने विजय
IND vs AUS ICC world Cup 2023 Highligts in Marathi | टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवत शानदार सुरुवात केली आहे. विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध निर्णायक खेळी केली.
मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पाचव्या सामन्यात टीम इंडियाने विजयी सलामी दिलीय. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला चितपट केलंय. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय नोंदवला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 200 धावांचं आव्हान हे 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कलताना टीम इंडियाने झटपट 3 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर केएल आणि विराट या दोघांनी 165 धावांची भागीदारी करत टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सोपा केला. विराटने 85 आणि केएल राहुल याने नॉट आऊट 97 धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
LIVE Cricket Score & Updates
-
IND vs AUS Live Score | टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात, ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय
चेन्नई | टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 200 धावांचं आव्हान टीम इंडियाने 41.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. केएल राहुल आणि विराट कोहली या दोघांनी टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. विराट कोहली याने 85 धावा केल्या. तर केएल राहुल याने नॉट आऊट 97 रन्स केल्या. केएल राहुल याने सिक्स खेचत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
-
IND vs AUS Live Score | विराट कोहली आऊट
चेन्नई | टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. विराट कोहली 85 धावा करुन कॅच आऊट झाला आहे. विराटने या खेळीत 6 चौकार लगावले.
-
-
IND vs AUS Live Score | केएलचं अर्धशतक, टीम इंडिया सुस्थितीत
चेन्नई | विराट कोहली याच्यानंतर केएल राहुल यानेही 72 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. या दरम्यान या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही पूर्ण केली आहे.
-
IND vs AUS Live Score | विराट कोहलीचं अर्धशतक
चेन्नई | टीम इंडिया अडचणीत असताना विराट कोहली याने 75 बॉलमध्ये अर्धशतक ठोकत वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात केली आहे. विराटच्या अर्धशतकासह टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडियाला विजयासाठी आणखी 100 धावांची गरज आहे.
-
IND vs AUS Live Score | विराट-केएलने डाव सावरला, चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
चेन्नई | ईशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर तिघेही भोपळा न फोडता आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची 3 बाद 2 अशी स्थिती झाली. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला आहे.
-
-
IND vs AUS Live Score | विराटची कॅच सोडली की मॅच सोडली?
चेन्नई | ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श याने विराट कोहली याचा 12 धावांवर खेळत असताना टीम इंडियाच्या डावातील 8 व्या ओव्हरदरम्यान कॅच सोडला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळालाय. आता विराट या जीवनदानाचा किती फायदा घेतो, हे पाहावं लागणार आहे.
-
IND vs AUS Live Score | ऑस्ट्रेलियाची आक्रमक सुरुवात, टीम इंडियाची तिकडी झिरोवर आऊट
चेन्नई | ईशान किशन, रोहित शर्मा याच्यानंतर श्रेयस अय्यर हा देखील झिरोवर आऊट झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाची 2 ओव्हरनंतर 3 बाद 2 अशी झाली.
-
IND vs AUS Live Score | टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात, रोहित शर्मा झिरोवर बाद
चेन्नई | ऑस्ट्रेलियाने शानदार सुरुवात केली आहे. 200 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाला कांगारुंनी झटका दिला आहे. मिचेल स्टार्क याने पहिल्याच ओव्हरमध्ये ईशान किशन याला पहिल्याच बॉलवर कॅच आऊट केलं. त्यानंतर सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये जोश हेझलवूड याने कॅप्टन रोहित शर्मा याला एलबीडबल्यू केलं. रोहित शर्माही झिरोवर आऊट झाला.
-
IND vs AUS Live Score | ईशान किशन गोल्डन डक
चेन्नई | टीम इंडियाची 200 धावांचा पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली आहे. मिचेल स्टार्क याने टीम इंडियाला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका दिला आहे. ईशान किशन हा मोठा शॉट मारण्याच्या नादात झिरोवर आऊट झाला आहे.
-
IND vs AUS Live Score | रोहित-ईशान सलामी जोडी मैदानात, टीम इंडियासमोर 200 रन्सचं टार्गेट
चेन्नई | टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामी जोडी मैदानात खेळत आहे. टीम इंडियाला विजयासाठी 300 बॉलमध्ये 200 धावांची गरज आहे.
-
IND vs AUS Live Score | ऑस्ट्रेलिया 199 धावांवर ऑलआऊट, टीम इंडियाला 200 रन्सचं टार्गेट
चेन्नई | मिचेल स्टार्क मोठा फटका मारण्याच्या नादात 28 धावांवर कॅच आऊट झाला. यासह ऑस्ट्रेलिया 199 धावांवर ऑलआऊट झाली. आता टीम इंडियासमोर विजयासाठी 200 धावांचं आव्हान आहे.
-
IND vs AUS Live Score | एडम झॅम्पा आऊट, हार्दिक पंड्याला पहिली विकेट
चेन्नई | हार्दिक पंड्या याने पहिली विकेट घेत ऑस्ट्रेलियाला नववा धक्का दिला आहे. हार्दिकने एडम झॅम्पा याला आऊट केलंय.
-
IND vs AUS Live Score | कॅप्टन पॅट कमिन्स तंबूत
चेन्नई | ऑस्ट्रेलियाने आठवी विकेट गमावली आहे. कांगारुंचा कॅप्टन पॅट कमिन्स 15 धावांवर आऊट झाला. जसप्रीत बुमराह याने पॅटला आऊट केलं.
-
IND vs AUS Live Score | आर अश्विन याची पहिली शिकार, कॅमरुन ग्रीन आऊट
चेन्नई | आर अश्विन याने सामन्यातील पहिली विकेट घेत ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला आहे. अश्विनने ग्रीनला उपकर्णधार हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं.
-
IND vs AUS Live Score | ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का
चेन्नई | टीम इंडियाच्या फिरकी बॉलिंगसमोर ऑस्ट्रेलियाने नांग्या टाकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने सहावी विकेट गमावली आहे. ग्लेन मॅक्सवेल आऊट झाला आहे. मॅक्सवेल कुलदीपच्या बॉलिंगवर क्लिन बोल्ड झाला. मॅक्सवेल याने 15 धावा केल्या.
-
IND vs AUS Live Score | ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, कांगारुं बॅकफुटवर
चेन्नई | रविंद्र जडेजा याने स्टीव्हन स्मिथ, मार्नस लबुशेन याच्यानंतर आता एलेक्स कॅरी याला आऊट करत कांगारुंना बॅक फुटवर ढकललं आहे. कांगारुंचा स्कोअर 5 बाद 119 झाला आहे.
-
IND vs AUS Live Score | जडेजाचा कांगारुंना दणका, ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट
चेन्नई | रवींद्र जडेजा याने स्टीव्हन स्मिथ याच्यानंतर मार्नस लबुशेन याचा काटा काढला आहे. स्टीव्हन स्मिथ याला क्लिन बोल्ड केल्यानंतर लबुशेन याला विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं.
-
IND vs AUS Live Score | रविंद्र जडेजाच्या फिरकीसमोर स्टीव्हन स्मिथच्या दांड्या गुल
चेन्नई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला आहे. रविंद्र जडेजा याने फिरकीच्या जोरावर स्टीव्हन स्मिथच्या दांड्या गुल केल्या आहेत. स्टीव्हन स्मिथ 46 धावांवर आऊट झाला
-
IND vs AUS Live Score | डेव्हिड वॉर्नर आऊट, कुलदीपची पहिली शिकार
चेन्नई | कुलदीप यादव याने डेव्हिड वॉर्नर याला आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट करत ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका दिला आहे. वॉर्नरने 52 बॉलमध्ये 41 धावा केल्या.
-
IND vs AUS Live Score | ऑस्ट्रेलियाचं अर्धशतक पूर्ण
चेन्नई |ऑस्ट्रेलियाने अर्धशतक पूर्ण केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा 11 ओव्हरनंतर 1 आऊट 51 असा स्कोअर झाला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ ही जोडी मैदानात खेळत आहे. तर मिचेल मार्श हा झिरोवर आऊट झाला आहे.
-
IND vs AUS Live Score : जसप्रीत बुमराहला पहिलं यश
भारत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सुरू असलेल्या सामन्यात जसप्रीत बुमराह याने मिचेल मार्श याला आऊट केलं आहे. विराट कोहलीने स्लीपमध्ये कडक कॅच घेतला.
-
ind vs aus live updates : सूर्यकुमारला डच्चू
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यामध्ये दोन मुंबईकर खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर आणि सुर्यकुमार यादव यांच्यात अय्यरला संधी मिळाली आहे.
-
Ind vs aus live updates : दोन्ही संघांची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स केरी (W), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (डWब्ल्यू), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
-
ind vs aus live score : रोहितचा मास्टरप्लॅन
रोहित शर्माने आज तीन स्पिनर्स अश्विन, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांना संधी दिली आहे. तर दोन मुख्य वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. भारताकडे तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्या पर्याय आहे.
-
IND vs AUS Live Update : कमिन्सने जिंकला टॉस
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघामध्ये मोठा बदल केला असून तीन स्पिनर्स आणि दोन वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे.
-
IND vs AUS Live Update : शुभमन गिल आऊट
भारताला मोठा धक्का बसला आहे. कारण शुभमन गिलला डेंग्यू झाला असून त्याला पहिल्या सामन्यात खेळणे कठीण आहे. तो खेळला नाही तर सलामीवीर म्हणून इशान किशनला संधी मिळणार हे निश्चित दिसत आहे.
-
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया हेड टू हेड
ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात एकूण 12 वेळा भिडले आहेत. इथेही ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामन्यात भारताचा पराभव केला आहे.
Published On - Oct 08,2023 1:01 PM