IND vs AUS Live Streaming | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया महामुकाबला असा फुकटात पाहा, फक्त इतकंच करा
India vs Australia ICC world Cup 2023 Live Streaming | टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहेत. तसेच भारतीय क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या.
चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील पहिले 4 सामने पार पडले आहेत. आता पाचवा आणि बहुप्रतिक्षित सामना हा रविवारी होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना असणार आहे. वर्ल्ड कपआधी हे दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत आमनेसामने आले होते. टीम इंडियाने ती मालिका 2-1 फरकाने जिंकली होती. त्यामुळे आता टीम इंडिया तशीच कामिगिरी वर्ल्ड कपमध्ये कायम ठेवत विजयी सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर 5 वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या कांगारुंचा टीम इंडियाला चितपट करण्याचा प्रयत्न असणार आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा रविवारी 8 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कोणत्या स्टेडियममध्ये?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (चेपॉक) खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल. क्रिकेट चाहत्यांना विविध भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येईल.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर फुकट कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर फुकटात पाहता येणार आहे. मात्र त्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार एप डाऊनलोड करावा लागेल.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.