IND vs AUS Live Streaming : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना कुठे आणि केव्हा पाहता येणार? जाणून घ्या
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार? याची उत्सुकता लागून आहे. 11 फेब्रुवारीला हा सामना होणार असून कुठे आणि कधी पाहता येईल ते जाणून घेऊयात..
मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारत ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ सज्ज आहेत. दक्षिण अफ्रिकेतील बेनोनी येथील विलोमूरे पार्क मैदानात हा सामना रंगणार आहे. उपांत्य फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानाचा पराभव केला आहे. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने अतितटीचे राहिले. त्यामुळे अंतिम फेरीचा सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळू शकते. भारताने साखळी फेरीत बांगलादेश, आयर्लंड, नेपाळ या संघांना पराभूत केलं. तर सुपर सिक्समध्ये युएसए आणि न्यूझीलंडचा पराभव केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विलोमूरेची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीवर बरंच काही अवलंबून असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 190 च्या धावसंख्या उभारू शकतो. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. मागच्या पाच सामन्यात या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. यात दोन्ही उपांत्य फेरीचा समावेश आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर 19 विश्वचषक फायनल कधी होणार?
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी, 11 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1:30 वाजता होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर 19 वर्ल्डकप फायनल कुठे होणार आहे?
बेनोनी येथील सहारा पार्क विलोमूर क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम लढत होणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर 19 वर्ल्डकप फायनल कुठे पाहता येणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर 19 वर्ल्डकप फायनलचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण पाहता येईल. तसेच हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येईल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत अंडर 19: आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.
ऑस्ट्रेलिया अंडर 19: हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर.