IND vs AUS | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडिया, 11 खेळाडूंमध्ये कोण कोण?
India vs Ausralia 1st Odi | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 सप्टेंबर रोजी एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवणयात येणार आहे. जाणून घ्या टीम इंडियाची संभावित प्लेईंग ईलेव्हन.
मोहाली | आशिया कप 2023 जिंकल्यानंतर टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाची एकूण 3 सामन्यांच्या या मालिकेसाठी 18 सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या 2 सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या या चौघांना विश्रांती दिलीय. हे चौघे तिसऱ्या सामन्यातून टीममध्ये परततील. त्यामुळे पहिल्या 2 सामन्यांसाठी केएल राहुल कॅप्टन आणि रवींद्र जडेजा हा उपकर्णधारपद सांभाळणार आहे.
आयसीसी वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. तर ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया दोन्ही संघांचा पहिला सामना हा एकमेकांविरुद्धच 8 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे ही 3 सामन्यांची मालिका टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक अशी आहे. या मालिकेतील पहिला सामना हा 22 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. सामन्याचं आयोजन हे पंजाब मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये करण्यात आलंय. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाची संभावित प्लेईंग ईलेव्हन कशी असेल, हे आपण जाणून घेऊयात.
शुबमन गिल आणि ईशान किशन हे दोघे ओपनिंग करतील. हे दोघे वादळी सुरुवात करतात. त्यामुळे या दोघांवर सलामीची जबाबदारी दिली जाऊ शकते. मीडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यर, कॅप्टन केएल, आणि सूर्यकुमार यादव खेळतील. तर उपकर्णधार रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघे ऑलराउंड भूमिका पार पाडतील.
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी ही मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या तिघांवर असेल. तर आर अश्विन याची 20 महिन्यांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया
केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.
पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाची संभावित प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वॉशिंगटन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.