IND vs AUS | पहिल्या 2 सामन्यात रोहितला विश्रांती, मग शुबमनसोबत ओपनिंगला कोण?

India vs Australia 1st Odi | पहिल्या सामन्यासाठी शुबमन गिल तयार. पण त्याच्यासोबत रोहित शर्मा याच्या गैरहजेरीत कोण उतरणार? तिघांपैकी या बॅट्समनच्या नावावर शिक्कामोर्तब.

IND vs AUS | पहिल्या 2 सामन्यात रोहितला विश्रांती, मग शुबमनसोबत ओपनिंगला कोण?
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 7:49 PM

मोहाली | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका आहे. त्यापैकी पहिल्या 2 सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि विराट कोहली या चौघांना ब्रेक देण्यात आलाय. हे चौघे तिसऱ्या वनडेत खेळतील. त्यामुळे पहिल्या 2 सामन्यात केएल राहुल हा कॅप्टन आणि रवींद्र जडेजा उपकर्णधार असणार आहे. रोहित पहिल्या 2 सामन्यात नसल्याने ओपनिंगला शुबमन गिल याच्यासोबत कोण येणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शुबमनसोबत ओपनिंगला कोण?

आयसीसी वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ वर्ल्ड कपमध्ये आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे या मालिकेला आणखी महत्त्व आहे. मात्र रोहित पहिल्या 2 सामन्यांमध्ये नाहीये त्यामुळे शुबमन गिलसोबत ओपनिंग कोण करणार, असा मोठा प्रश्न आहे. यासाठी टीम इंडियाकडे स्वत: कॅप्टन केएल राहुल, ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन हे ओपनर आहेत. मात्र या तिघांपैकी एकाचं नाव ओपनिंगसाठी आघाडीवर आहे.

शुबमनसोबत विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन ओपनिंग करु शकतो. ईशान हा डावखुरा आहे. तर शुबमन हा उजव्या हाताने बॅटिंग करतो. त्यामळे लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन म्हणूनही हा पर्याय उत्तम आहे. तसेच हे दोघे सातत्याने चमकदार कामगिरी करतायेत. त्यामुळे शुबमनसोबत ईशानच सलामीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.