IND vs AUS | टीम इंडियासाठी गूड न्यूज, ‘या’ क्रिकेटरचं टीममध्ये कमबॅक
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये 1-0 ने आघाडीवर आहे. आता या सीरिजमधील दुसरा सामना हा रविवारी 19 मार्च रोजी होणार आहे. या सामन्यातून टीम इंडियाचा मोठा खेळाडू परतणार आहे.
मुंबई | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने सलग चौथ्यांदा 2-1 अशा फरकाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. यानंतर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना हा मुंबईतील वानेखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातही टीम इंडियाने कांगारुंना पाणी पाजलं. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय क्रिकेट संघाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार सराव केला आहे. टीम इंडियाला दुसऱ्या सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियाला आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत विजय मिळवावाच लागेल.
या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियात मोठ्या खेळाडूचं पुनरागमन होणार आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोटात दहशतीचं वातावरण आहे. टीम इंडियाचा कॅप्टन दुसऱ्या सामन्यातून संघात परतणार आहे. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्यामुळे उपकर्णधार हार्दिक पंड्या याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती, जी हार्दिकने यशस्वीपणे पार पाडली.
रोहित शर्मा त्याची पत्नी रितीका सजदेह याच्या भावाच्या लग्नासाठी पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. बीसीसाआयने जेव्हा वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा केली तेव्हाच रोहित पहिल्या वनडेत खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र आता रोहित दुसऱ्या सामन्यात परतणार आहे. यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार आहे. रोहितच्या कमबॅकमुळे इशान किशन किंवा शुबमन गिल या दोघांपैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावं लागणार आहे. त्यामुळे रोहितसाठी कोण बाहेर होणार, हे कळेलच.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल आणि जयदेव उनादकट.
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीवहन स्मिथ (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स केरी, नाथन एलिस, कॅमरन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिश, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि एडम झॅम्पा.