IND vs AUS Odi : स्टीव्हन स्मिथ याच्या कॅप्टन्सीत भारतविरुद्धच्या सामन्यात काय झालं होतं माहितीये का?

स्मिथने त्याच्या नेतृत्त्वात भारताविरूद्ध शेवटचा सामना कधी खेळला होता आणि त्याचा निकाल काय होता? जाणून घ्या!

IND vs AUS Odi : स्टीव्हन स्मिथ याच्या कॅप्टन्सीत भारतविरुद्धच्या सामन्यात काय झालं होतं माहितीये का?
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 3:49 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका 17 मार्चपासून सूरू होणार आहे. या मालिकेमध्ये स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स आईच्या निधनामुळे मायदेशी गेल्याने स्मिथकडे कर्णधारपद देण्यात आलं आहे. स्मिथने कसोटी मालिकेमध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली तिसरा सामना जिंकून दिला होता आणि चौथा सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे आता एकदिवसीय मालिकेमध्ये स्मिथ कशी कामगिरी करतो याकडे क्रीडा प्रेमींचं लक्ष लागून आहे. स्मिथने त्याच्या नेतृत्त्वात भारताविरूद्ध शेवटचा सामना कधी खेळला होता आणि त्याचा निकाल काय होता हे आपण पाहणार आहोत.

स्टीव्ह स्मिथने भारताविरूद्ध 2017 साली नागपूरमध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यावेळी कांगारूंचा संघही मजबूत होता. मात्र टीम इंडियाला भारतामध्ये पराभूत करणं इतकं सहजशक्य नाही. शेवटच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 243 धावांचं लक्ष्य भारतीय संघाला दिलं होतं. भारताने या लक्ष्याचा पाठलाग अगदी सहजपणे हे लक्ष्य पूर्ण केलं होतं.

स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केलं आहे. त्यामधील 25 सामने त्याने जिंकले आहेत तर 23 सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचा भविष्यातील मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र बॉस टेम्परिंग प्रकरणात सापडल्याने त्याच्यावर ऑस्ट्रेलिया क्रिकटने एक वर्षांची बंदी घातली होती.

दरम्यान, एक वर्षानंतर स्मिथने पुनरागमन केल्यावर त्याला टीकेचा सामना करावा लागला होता. क्रीडा चाहत्यांनी त्याला चीटर चीटर म्हणून चिडवलं होतं. मात्र स्मिथने खचून न जाता आपल्या बॅटने टीकाकारांना उत्तर दिलं होतं. आता स्मिथने संघातील महत्त्वाचा खेळाडू असून कमिन्सच्या अनुपस्थितीत संघाने त्याच्याकडेच संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.