IND vs AUS : ऋषभ पंतच्या चुकीमुळे कर्णधार रोहित शर्मा भडकला, झालं असं की…Watch Video

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु आहे. या सामन्यात एक चूक किती महागात पडू शकते याचा अंदाज कर्णधार रोहित शर्माला आहे. मोक्याच्या क्षणी विकेटकीपर ऋषभ पंतने केलेल्या चुकीमुळे कर्णधार रोहित शर्मा तापला. इतकंच काय तर जसप्रीत बुमराहचं षटक संपल्यानंतर त्याला झापलं.

IND vs AUS : ऋषभ पंतच्या चुकीमुळे कर्णधार रोहित शर्मा भडकला, झालं असं की...Watch Video
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 10:33 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलियाला भारताविरूद्धचा सामना काहीही करून जिंकावा लागेल. अन्यता ऑस्ट्रेलियाचं अस्तित्व जर तर अवलंबून राहील. ऑस्ट्रेलिायने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारताने 20 षटकात 5 गडी गमवून 205 धावा केल्या आणि विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं. पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने डेविड वॉर्नरला तंबूचा रस्ता दाखवला आणि टीम इंडिया चांगल्या पोझिशनमध्ये आली. ऑस्ट्रेलियावर दबाब टाकण्याची टीम इंडियाकडे चांगली संधी होती. मिचेल मार्क मैदानात आल्यानंतर समोर भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह होता. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया काही अंशी बॅकफूटवर गेली होती. चौथ्या चेंडूवर मिचेल मार्कला बाद करण्याची चांगली संधी आली. बॉल ग्लोव्हजला लागून खूपच वर चढला अशा स्थितीत ऋषभ पंतच्या हातात झेल होता. मात्र एक चूक झाली आणि झेलपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे रोहित शर्मा चांगलाच संतापला.

हातातला झेल सोडल्याने आणि विकेट महत्त्व रोहित शर्मा चांगल्यापैकी माहिती आहे. ऑस्ट्रेलियाच्या एखाद्या खेळाडूला जीवदान देणं किती महागात पडू शकतं सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे षटक संपताच रोहित शर्माने ऋषभ पंतला खडे बोल सुनावले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चुकीनंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज चार्ज झाले आणि त्यांनी भारतीय गोलंदाजांवर प्रहार करण्यास सुरुवात केली. मिचेल स्टार्कचा झेल सोडला तेव्हा त्याने आपलं खातंही खोललं नव्हतं. महत्त्वाच्या सामन्यात चूक केल्याने रोहितलाही राग अनावर झाला. इतकंच काय तर दुसऱ्या षटकात अर्शदीपच्या हातून फॉलो थ्रूमध्ये झेल सुटला. असे मिचेल मार्शला दोन जीवदान मिळाले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.