IND vs AUS : तिसऱ्या विजयापासून टीम इंडियाला मॅक्सवेलनं रोखलं, शतकी खेळीसह मालिकेत कमबॅक

ऑस्ट्रेलियाला भारताला सहजासहजी मालिका जिंकून देईल असं शक्य आहे का? तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक केलं आहे. मॅक्सवेलच्या चिवट खेळीमुळे मालिका विजयाचं स्वप्न दूर गेलं आहे. आता चौथ्या सामन्यात भारत मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागलणार आहेत.

IND vs AUS : तिसऱ्या विजयापासून टीम इंडियाला मॅक्सवेलनं रोखलं, शतकी खेळीसह मालिकेत कमबॅक
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 10:47 PM

मुंबई : मुंबई : ऑस्ट्रेलियाने भारताला तिसऱ्या टी20 सामन्यात 5 गडी राखून पराभूत केलं आणि मालिकेत 2-1 अशी स्थिती आणली. तिसरा सामना जिंकून भारताचं मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. खऱ्या मालिका विजयाचं स्वप्न एक सामना दूर गेलं असं म्हणावं लागेल. ऋतुराज गायकडवाडची शतकी खेळी या विजयामुळे व्यर्थ गेली असंच म्हणावं लागेल. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासठी 223 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान रोखण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना अपयश आलं. मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. नाबाद शतकी खेळीसह संघाला विजय मिळवून दिला. षटकार आणि चौकारांचा वर्षाव करत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं. मॅक्सवेलला बाद करण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना अपयश आलं. मॅक्सवेलने 48 चेंडूत 104 धावा केल्या.  यात 8 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे.

भारताचा डाव

भारताकडून ऋतुराज गायकवाड जबरदस्त खेळी केली. यशस्वी जयस्वाल झटपट बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने मोर्चा सांभाळला. यशस्वी जयस्वाल अवघ्या 6 धावा करून तंबूत परतला. संघाची धावसंख्या 14 असतानाच पहिला धक्का बसला. त्यानंतर खातं न खोलता इशान किशन आऊट झाला. मात्र टीम इंडिया बॅकफुटला असताना ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली खेळी केली. सूर्यकुमार 29 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. ऋतुराज गायकवाड याने 57 चेंडूत 123 धावांची खेली केली. यात 13 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे. त्याला तिलक वर्माने साथ दिलीय. तिलक वर्माने 24 चेंडूत 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि एरॉन हार्डी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, तिलक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, एरॉन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.