7 सामन्यात फक्त 82 धावा तरी समित द्रविडला टीम इंडियात स्थान! निवड करण्याचं कारण असं की…

भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघात राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडची निवड झाली आहे. त्याच्या निवडीवरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. कारण महाराजा टी20 ट्रॉफीत त्याची बॅट काही चालली नाही. त्यामुळे संघात निवड होण्याचं कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

7 सामन्यात फक्त 82 धावा तरी समित द्रविडला टीम इंडियात स्थान! निवड करण्याचं कारण असं की...
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 3:13 PM

समित द्रविडची निवड भारतीय संघात झाली आहे. वडिलांनी क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर समितकडे त्याच अपेक्षेने पाहिलं जात आहे. अंडर 19 क्रिकेट संघात आता समित दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध समित द्रविड भारतीय संघात खेळणार आहे. समितला घरातच लहानपणापासून क्रिकेटचे धडे मिळाले आहेत. त्यामुळे निश्चितच राहुल द्रविड आणि त्याची तुलना होणार यात शंका नाही. आजवर असंच चित्र पाहिलं गेलं आहे. 18 वर्षांच्या समितवर गेल्या 2 वर्षांपासून सर्वांची नजर आहे. राहुल द्रविडचा मुलगा असल्याने त्याच्यावर अतिरिक्त भार असेल यात शंका नाही. असं सर्व चित्र असताना समितची टीम इंडियात निवड झाल्याने कुटुंबिय आणि चाहते खूश झाले आहेत. पण समितची अंडर 19 संघात निवड झाली कशी? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अंडर 19 संघात निवड झाली खरी, पण या निवडीपूर्वी पार पडलेल्या स्पर्धेत समित पूर्णपणे फेल ठरला आहे. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनची महाराजा टी20 ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत समित मैसूरू वॉरियर्स संघाकडून खेळत आहे. पण ही स्पर्धा काय त्याच्यासाठी चांगली गेली नाही. या स्पर्धेत त्याला 10 पैकी 7 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. पण यावेळी त्याला एकही अर्धशतक करता आलं नाही. सात सामन्यात त्याने फक्त 82 धावा केल्या. या स्पर्धेत त्याचा सर्वोत्तम स्कोअर हा 33 राहिला आहे. असं असूनही समितच्या समितच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

समित महाराजा टी20 स्पर्धेत फेल ठरला असला तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अंडर 19 देशांतर्गत कूच बिहार स्पर्धेत त्याची बॅट चांगलीच तळपली होती. कर्नाटकला चॅम्पियन करण्यात समितची मोलाची साथ लाभली. समितने 8 सामन्यात 362 धावा केल्या आणि मीडियम पेस बॉलिंग करत 16 विकेट घेतल्या आहेत. उपांत्य आणि अंतिम फेरीत 2-2 गडी बाद करत आपली छाप सोडली होती. याचा अर्थ असा की, सिनिअर स्पर्धेत फेल ठरला असला तरी अंडर 19 स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्याच आधारावर समितची निवड अंडर 19 क्रिकेट संघात केली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका 21 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पहिला सामना 21 सप्टेंबरला, दुसरा सामना 23 सप्टेंबरला आणि तिसरा सामना 26 सप्टेंबरला होणार आहे. ही मालिका पुदुचेरीला होणार आहे. तर चार दिवसीय दोन सामन्यांची मालिका चेन्नईत 30 सप्टेंबरपासून असणार आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-19 संघ: रुद्र पटेल (VC) (GCA), साहिल पारख (MAHCA), कार्तिकेय केपी (KSCA), मोहम्मद अमान (Captain) (UPCA), किरण चोरमले (MAHCA), अभिज्ञान कुंडू ( WK) (MCA), हरवंशसिंग पनगालिया (WK) (SCA), समित द्रविड (KSCA), युधाजित गुहा (CAB), समर्थ एन (KSCA), निखिल कुमार (UTCA), चेतन शर्मा (RCA), हार्दिक राज (KSCA) ), रोहित राजावत (MPCA), मोहम्मद इनान (KCA).

चार दिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-19 संघ: वैभव सूर्यवंशी (Bihar CA), नित्या पांड्या (BCA), विहान मल्होत्रा ​​(VC) (PCA), सोहम पटवर्धन (Captan) (MPCA), कार्तिकेय केपी (KSCA), समित द्रविड (KSCA), अभिज्ञान कुंडू (WK) (MCA), हरवंश सिंग पनगालिया (WK) (SCA), चेतन शर्मा (RCA), समर्थ एन (KSCA), आदित्य रावत (CAU), निखिल कुमार (UTCA), अनमोलजीत सिंग ( PCA), आदित्य सिंग (UPCA), मोहम्मद इनान (KCA)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.