Ind vs Aus : रोहित शर्मा याने पुजासाराठी मोठं मन दाखवलं पण कारकिर्दीला लागला ‘हा’ मोठा डाग
कॅप्टन असावा तर असा, निस्वार्थी हिटमॅन अशा अनेक उपाधी त्याला देण्यात आल्या. हे सर्व खरं असलं तरी रोहितच्या कारकिर्दीला एक डाग लागला आहे.
मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटीमध्ये मनाचा मोठेपणा दाखवला खरा पण याचा त्याला मोठा फटका बसला आहे. हिटमॅन म्हणजेच रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या 115 धावांचा पाठलाग करताना सुरूवातीपासून चांगला फॉर्म दिसला. के. एल. राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराची आणि रोहितची भागीदारी होत होती. मात्र रोहितच्या चुकीच्या कॉलमुळे रनआऊट होण्याची वेळ आली त्यावेळी 100 वा कसोटी सामना खेळत असलेल्या पुजाराची आऊट होऊ न देण्यासाठी रोहित स्वत: आऊट झाला होता.
सामन्याच्या 7व्या ओव्हरमध्ये रोहितने कुहमेनच्या पाचवा बॉल मिड-विकेटच्या दिशेने मारला. रोहितला दोन धावा हव्या होत्या. त्यासाठी त्याने पहिली धाव जोरात घेतली आणि दुसरी धाव घेण्यासाठी माघारी परतला तेव्हा त्याने पाहिलं की पीटर हँड्सकॉम्ब थ्रो करत आहे. मात्र पुजारा आधीच रोहितच्या कॉलमुळे दुसरी धाव घेण्यासाठी निघाला होता.
पुजाराला रोहित थांबवणार मात्र तो जवळपास अर्ध्या क्रीजपर्यंत आला होता. रोहितने त्यावेळी पुजाराला काही न बोलता आपली दुसरी धाव पूर्ण केली मात्र पीटर हँड्सकॉम्बचा थ्रो आला होता कीपरने त्याला बाद केलं होतं. रोहित माघारी फिरू शकला असता तर पुजारा बाद झाला असता मात्र रोहितने तसं न करता त्याच्या चुकीचा पुजाराला फटका बसू नये यासाठी आपली विकेट बहाल केली.
Rohit Sharma, Leader of the pack! Despite batting so well, walked off after run out because this is Pujara’s ? th match@ImRo45 ?pic.twitter.com/bJAgA024Gb
— JaswanthNtRohit ᴹⁱ? (@AlapatiJaswanth) February 19, 2023
सोशल मीडियावर रोहित शर्माचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. नेटकरी आणि क्रीडाप्रेमींनी रोहितचं कौतुक केलं. कॅप्टन असावा तर असा, निस्वार्थी हिटमॅन अशा अनेक उपाधी त्याला देण्यात आल्या. हे सर्व खरं असलं तरी रोहितच्या कारकिर्दीला एक डाग लागला आहे. रोहित 10 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच रन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित शर्माने दुसऱ्या डावात 20 चेंडूंत 31 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले .
दरम्यान, भारताने हा सामना 6 विकेटे्सने जिंकला, चेतेश्वर पुजाराने या सामन्यात नाबाद खेळी करत चौकार मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. चेतेश्वर पुजाराने आपल्या 100 व्या सामन्यात पहिल्या डावात 0 तर दुसऱ्या डावामध्ये नाबाद 31 धावा केल्या.