IND vs AUS : भल्या-भल्यांच्या दांड्या गुल करणाऱ्या मिचेल स्टार्क याच्या विरोधात गिलने केला वर्ल्ड रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटीमध्ये भल्या-भल्यांच्या दांड्या गुल करणाऱ्या स्टार्कच्या विरोधात अशी कामगिरी करत शुबमन गिलने केला वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

IND vs AUS : भल्या-भल्यांच्या दांड्या गुल करणाऱ्या मिचेल स्टार्क याच्या विरोधात गिलने केला वर्ल्ड रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 3:57 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये कांगारूंनी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने चांगली सुरूवात केली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 74 धावांची भागादारी केली. युवा शुबमन गिल याने शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. गिल अजूनही मैदानावर टिकून असून कांगारूंच्या गोलंदाजांना घाम फोडत आहे. यादरम्यान गिलने ऑस्ट्रेलियाचा खतरनाक बॉलर मिचेल स्टार्क याच्याविरोधात एक खास विक्रम केलाय. भल्या-भल्यांच्या दांड्या गुल करणाऱ्या स्टार्कच्या विरोधात अशी कामगिरी करत त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

नेमका काय आहे वर्ल्ड रेकॉर्ड

कसोटी क्रिकेटमध्ये स्टार्कविरुद्ध एकदाही बाद न होता सर्वाधिक धावा करणारा शुबनम गिल पहिला खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानच्या नावावर होता. युनूस खानने पहिल्यांदा आऊट होण्याआधी स्टार्कविरुद्ध 112 धावा केल्या होत्या. मात्र शुभमन गिलने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. आताही तो मैदानात बॅटींग करत असून 233 चेंडूत 127 धावा केल्या आहेत. आतापर्यंतच्या या खेळीत त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा 35 धावा करून बाद झाला आहे. त्यानंतर भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराही फारशी चमक दाखवू शकला नाही. 42 धावा करून तो बाद झाला, चांगल्या सुरूवातीचं त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता आलं नाही. विराट कोहली आणि गिल आता मैदानात असून अजुनही भारत 230 धावांनी पिछाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियाची बॅटींग

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 480 धावांवर आटोपला आहे. उस्मान ख्वाजाची 180 धावांची खेळी आणि कॅमरन ग्रीनची 114 धावांची शतकी खेळीही महत्त्वाची ठरली. भारतीय गोलंदाजांना ही जोडी फोडायला चांगलाच संघर्ष करायला लागला. कॅमरन ग्रीन बाद करत आर. आश्विनने हो जोडी फोडली त्याच ओव्हरमध्ये एलेक्स कॅरीला बाद करत आणखी एक धक्क दिला होता.

एलेक्स कॅरी याला आश्विनने भोपळाही फोडून दिला नाही. त्यानंतर मिचेल स्टार्कलाही जास्तवेळ मैदानात तग धरता आला नाही. नाथन लायन आणि ख्वाजा यांनी भागीदारी करायला सुरूवात केली. अक्षर पटेल याने 180 धावांवर ख्वाजाला बाद केलं त्यानंतर आलेल्या टॉड मर्फी आणि नाथन लायन यांनी गोलंदाजांची परीक्षा घेतली. टॉड मर्फी याला आश्विनने 41 धावांवर बाद केलं तर त्यानंतर नाथन लायन यालाही 41 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट केलं. मर्फी आणि लायन यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाला आणखी मजबूत स्थितीत पोहोचवलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.