IND vs AUS : टीम इंडियासाठी धक्का देणारी बातमी, दुसऱ्या कसोटी सामन्यातही हा खेळाडू मुकणार!

भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रीडारसिकांसाठी धक्का देणारी बातमी आहे.दुसऱ्या कसोटीला दिग्गज खेळाडू मुकणार आहे.

IND vs AUS : टीम इंडियासाठी धक्का देणारी बातमी, दुसऱ्या कसोटी सामन्यातही हा खेळाडू मुकणार!
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 6:25 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला असून भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. 295 धावांनी पराभूत करत भारताने पर्थ कसोटीत इतिहास रचला आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. एडिलेडध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डे नाईट सामना होणार आहे. यापूर्वी याच मैदानात भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात डे नाईट सामना झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून जिंकला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारताला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. असं असताना भारताचा स्टार खेळाडू दुसऱ्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता आहे. दुसऱ्या सामन्यात शुबमन खेळेल की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान गिलच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. फ्रॅक्चर नसला तरी अजूनही फीट निाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, गिलला बरं होण्यासाठी अजून काही वेळ लागेल.

शुबमन गिलं टीम इंडियासोबत कॅनबरा येथे पोहोचला आहे. पण दोन दिवसीय पिंक बॉल सराव सामन्यात खेळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, शुबमन गिलला आणखी काही दिवस आराम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे एडिलेड येथे डे नाईट कसोटी सामना खेळण्याबाबत शंका आहे. जर त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात स्थान मिळालं नाही आणि भारताने दुसरा सामना कसोटी सामना जिंकला तर गिलला संधी मिळणं कठीण आहे. कारण पहिल्या कसोटीत शुबमन गिल खेळला नव्हता. त्यात देवदत्त पडिक्कलची कामगिरी साजेशी नव्हती. त्यामुळे तीच जागा शिल्लक होती. आता त्या जागेवर रोहित शर्मा खेळणार हे जवळपास निश्चित आहे.

रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात कौटुंबिक कारणास्तव खेळला नव्हता. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. त्यामुळे कर्णधार असल्याने प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये देवदत्त पडिक्कलला स्थान मिळणं कठीण आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात एडिलेडमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.