IND vs AUS T20 : प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, दोन खेळाडू बाहेर
IND vs AUS T20 : पहिला सामना हरल्यानंतर आता टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक नव्या फॉर्म्यूला बनवलाय. यात टीम इंडियानं दोघांना संधी दिली आहे. तर दोघांना डच्चूही दिला आहे.
नवी दिल्ली : नागपुरात (Nagpur) ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा (IND vs AUS T20) सामना सुरु झाला आहे. आधीच पावसामुळे सामन्यात अडसर आला होता. मैदान ओलं असल्यानं संध्याकाळी सात वाजताचा सामना हा रात्री साडेनऊ वाजता सुरु झाला. तर यावेळी हा सामना आठ-आठ ओव्हरचा खेळवला जाणार आहे. पहिला सामना हरल्यानंतर आता टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक नव्या फॉर्म्यूला बनवला आहे. यात टीम इंडियानं (Team India) उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार यांना वगळून जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंतला संधी दिली आहे.
कुणाला वगळलं?
टीम इंडियानं आता प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत. यामध्ये भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवला वगळण्यात आलंय.
कुणाला संधी?
टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध नवा फॉर्म्यूला वापरत जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंतला संधी दिली आहे. यावरुन टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध नवा फॉर्म्यूला वापरत असल्याचं दिसतंय.
दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या….
टीम इंडिया
? Team News ?
2⃣ changes for #TeamIndia as @RishabhPant17 & @Jaspritbumrah93 are picked in the team. #INDvAUS
Follow the match ▶️ https://t.co/LyNJTtkxVv
A look at our Playing XI ? pic.twitter.com/Lgh5KVZ95L
— BCCI (@BCCI) September 23, 2022
ऑस्ट्रेलिया संघ
2ND T20I. Australia XI: A Finch (c), C Green, S Smith, G Maxwell, T David, M Wade (wk), D Sams, P Cummins, S Abbott, A Zampa, J Hazlewood. https://t.co/PMFUaJD3HG #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 23, 2022
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असेल्या तीन सामन्यांच्या टी-20 सीरिजमध्ये पहिला सामना हरला आहे. त्यामुळे आता हा आजचा सामना जिंकण, हेच टीम इंडियाचं लक्ष असणार आहे. यासाठी संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केल्यानं संघाचा नवा फॉर्म्यूला देखील समोर आला आहे.
गोलंदाजीवरुन टीका
मागच्या सामन्यात गोलंदाजीवरुन टीम इंडियावर टीका करण्यात आली होती. या सगळ्यांचा विचार करून टीम इंडियानं बदल केले आहेत.