ind vs aus 5th t20 : सूर्या चुकलाच! टीम इंडियाच्या भावी युवराजला एकाही मॅचमध्ये नाही खेळवलं, पाहा कोण आहे तो?
Ind vs aus 5th t20 : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ज्या खेळाडूला टीम इंडियाचा भावी युवराज सिंह म्हणून बोललं जातं. नेमका कोण आहे तो खेळाडू? सूर्याने त्याला का संधी दिली नाही? जाणून घ्या
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील शेवटचा आणि पाचवा टी-20 सामना सुरू आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका भारताने खिशात घातली आहे. शेवटच्या सामन्यात भारतीय संघामध्ये काही बदल पाहायला मिळतील असं सर्वांना वाटत होतं. कारण बिग हिटर असलेल्या खेळाडूल सूर्याने एकाही सामन्यात खेळवलं नाही. या खेळाडूला टीम इंडियाचा भावी युवराज सिंह म्हणून बोललं जातं. नेमका कोण आहे तो खेळाडू? सूर्याने त्याला का संधी दिली नाही? जाणून घ्या.
कोण आहे तो खेळाडू?
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाहीतर शिवम दुबे आहे. शिवब दुबे हा मोठ्या हिटसाठी ओळखला जातो, टी- 20 मध्ये दुबेने अर्धशतक केलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दुबेने दमदार कामगिरी केली होत. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना आपली ताकद सर्वांना दाखवून दिली. सीएसकेकडूनही त्याने खेळताना शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मोठे हिट खेळून पॉवर हिटर असल्याचं दाखवून दिलं होतं. मात्र पाचही टी-20 सामन्यांमध्ये सूर्याने त्याला बेंचवर बसवलं.
शिवम दुबे याने मागील सीझनमध्ये 16 सामन्यांमध्ये 418 धावा केल्या होत्या. यामध्ये तीन अर्शशतकाचा समावेश असून 52 हा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे. आयपीलमधील त्याचा नाबाद 95 स्कोर आहे. शिवमला सूर्याने संधी द्यायला हवी होती म्हणजे संघाला सहावा पर्यायी बॉलरही झाला असता.
आजच्या सामन्याची प्लेइंग 11
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.