IND vs AUS T20 : भारताला 91 धावांचं टार्गेट, रोहित, राहुल जोमात
IND vs AUS T20 : ऑस्ट्रेलियानं भारतासमोर आठ षटकांत 91 धावांचं लक्ष्य ठेवलं. पहिले फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं आठ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या. आता हे टार्गेट भारताला गाठायचंय.
नागपूर : नागपुरात (Nagpur) ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा (IND vs AUS T20) सामना सुरु आहे. यावेळी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकात संघानं दोन गडी गमावले. विशेष म्हणजे या दोन्ही विकेट अक्षर पटेलच्या षटकात गेल्या. पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीनं कॅमेरून ग्रीनचा झेल सोडला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर भरपाई करताना ग्रीन धावबाद झाला. ग्रीन चार चेंडूत पाच धावा काढून बाद झाला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलनं ग्लेन मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केलं. मॅक्सवेलला खातेही उघडता आलं नाही. ऑस्ट्रेलियानं आठ षटकात नव्वद धावा करून भारताला 91 धावांचं टार्गेट दिलंय.
इनिंग ब्रेक
Innings Break!
Target for #TeamIndia – 9️⃣1️⃣
Our chase coming up shortly.
Scorecard ▶️ https://t.co/LyNJTtl5L3 #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/nu58uHpWBX
— BCCI (@BCCI) September 23, 2022
वेड 20 चेंडूत 43 धावा करत नाबाद
जसप्रीत बुमराहनं पाचव्या षटकात कर्णधार फिंचला क्लीन बोल्ड केलं. फिंचला 15 चेंडूत 31 धावा करता आल्या. चार गडी बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडनं स्टीव्ह स्मिथसोबत पाचव्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी रचली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर स्मिथ धावबाद झाला. वेड 20 चेंडूत 43 धावा करून नाबाद राहिला.
हायलाईट्स
- वेडनं चार चौकार आणि तीन षटकार मारले.
- स्मिथ पाच चेंडूत आठ धावा करून बाद झाला.
- भारताकडून अक्षर पटलेवनं दोन षटकांत तेरा धावा देत दोन गडी बाद केले.
- बुमराहने दोन षटकांत 23 धावा देत एक विकेट घेतली.
- हार्दिक पांड्याने एका षटकात 10 धावा आणि युझवेंद्र चहलने एका षटकात 12 धावा दिल्या.
- हर्षल पटेल सर्वात महागडा ठरला. त्याने दोन षटकात 32 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
अक्षरची हॅट्रिक हुकली
चौथ्या षटकात अक्षर पटेल पुन्हा गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. त्यानं सलग दोन चेंडूंवर मॅक्सवेल आणि डेव्हिडला बाद केलं.
आयसीसीचं ट्विट
Axar Patel strikes twice early on ??#INDvAUS | ? Scorecard: https://t.co/qNZMmN8MGZ pic.twitter.com/05H43u6JM4
— ICC (@ICC) September 23, 2022
ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर अक्षरनं टीम डेव्हिडला क्लीन बोल्ड केलं. डेव्हिडला तीन चेंडूत दोन धावा करता आल्या. मात्र, अक्षरची हॅटट्रिक हुकली.