IND vs AUS : टीम इंडियाला धक्का, हा खेळाडू दुखापतीमुळे आऊट, ‘या’ क्रिकेटरचा समावेश!
India vs Australia Bgt 2024 2025 : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे पहिला कसोटी सामना खेळणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियात मोठा बदल करण्यात आला आहे.
टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून श्रीगणेशा होत. सलामीचा सामना हा पर्थ येथे होणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्याआधी आतापर्यंत कसून सराव केला आहे. रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार या नात्याने जसप्रीत बुमराह भारताचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाच्या मुख्य संघात एकूण 18 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर 3 खेळाडूंना राखीव म्हणून संधी देण्यात आली आहे. अशात या पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मायदेशी परतला आहे. तर बीसीसीआयने त्याच्या जागी बदली म्हणून खेळाडूला ऑस्ट्रेलियाला पाठवलं आहे.
वेगवान गोलंदाज खलील अहमद याला दुखापत झाली आहे. खलील अहमद या राखीव खेळाडू होता. मात्र आता ता भारताच्या दिशेने रवाना झाला आहे. खलीलला दुखापतीमुळे नेट्समध्ये गोलंदाजी करण्यात त्रास जाणवत होता. खलीलला अशात विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. खलीलला त्यानंतर आता भारतात पाठवण्यात आलं आहे. आता खलील अहमद सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळणार की नाही? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
खलीलच्या जागी कुणाचा समावेश?
दरम्यान खलील अहमद याच्या जागी भारतीय संघात वेगवान गोलंदाज यश दयाल याचा समावेश करण्यात आला आहे. यश दयाल नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी 20I संघात होता. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र आता यश जोहान्सबर्ग येथून थेट पर्थला पोहचला आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.
राखीव खेळाडू: मुकेश कुमार, नवदीप सैनी, यश दयाल.