IND vs AUS : रोहित शर्मा याने ईशान किशनवर उचलला हात? समोर आला धक्कादायक Video
सामन्यामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला, त्यानंतर त्यांनी उस्मान ख्वाजाच्या नाबाद 104 धावांच्या आधारे दिवसाच्या खेळाच्या समाप्तीपर्यंत 4 विकेटच्या पराभवाने एकूण 255 धावा केल्या. सामन्यामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये? ऑस्ट्रेलियाचा संघ बॅटींग करत असताना 60 व्या ओव्हरवेळी ही घटना घडली. भारताचा युवा खेळाडू ईशान किशन बाहेर बेंचवर आहे. ओव्हरमधील ब्रेक दरम्यान तो मैदानात पाण्याची बाटली घेऊन आला होता. पाणी पिऊन झाल्यावर ईशानला रोहितने त्याला बाटली दिली, मात्र बाटली घेऊन जात असताना ईशानच्या हातातून ती पडली.
बाटली पडल्यावर परत ईशान परत आला आणि पाण्याची बाटली उचलू लागला. यावेळी रोहितला काय झालं काय माहित नाही? ईशाने मोठी चूक केल्यासारखी तो चिडला आणि त्याने त्याच्यावर हात उचलला. यादरम्यानचा रोहितचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत असून रोहितवर चाहते चिडले आहेत. नेटकऱ्यांनी रोहितला चांगलंच धारेवर धरलं आहे.
पाहा व्हिडीओ-
Indian Captain Rohit Sharma’s bad behaviour with junior Ishan Kishan #RohitSharma #vadapav #ishankishan #DCvsMI #MumbaiIndians #DelhiCapitals #NarendraModiStadium #Shami #viratkholi #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/utC0PfUR48
— ADITYA RAJPUT (@adityar4jput) March 9, 2023
दरम्यान, ईशान किशन आणि रोहित शर्मा दोघेही आयपीएलमधये मुंबई इंडिअन्स या संघाकडून खेळतात. रोहितनेही हे काही जाणूनबुजून केलं नाही हे सर्वांना माहित आहे. मात्र तरीसुद्धा चाहत्यांनी त्याला कोणत्याही खेळाडूचा अपमान करू नको असा सल्ला दिला आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.