विराट कोहलीने मारलेल्या धक्क्यानंतर सॅम कोनस्टास अखेर व्यक्त झाला, म्हणाला…

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने आपल्या खिशात घातली आहे. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 3-1 ने धुव्वा उडवला. या सामन्यात विराट कोहलीने सॅम कोनस्टासला धक्का मारल्याचं प्रकरण खूपच गाजलं. अखेर या प्रकरणावर सॅम कोनस्टासने मौन सोडलं आहे.

विराट कोहलीने मारलेल्या धक्क्यानंतर सॅम कोनस्टास अखेर व्यक्त झाला, म्हणाला...
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 3:40 PM

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसरा सामना ड्रॉ झाला आणि 1-1 अशी बरोबरी साधली गेली. त्यामुळे चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कोनस्टासच्या रुपाने डाव टाकला. नॅथन मॅकस्वीनीच्या जागी सॅम कोनस्टासला संधी दिली. चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात सॅम कोनस्टासने आपली चमक दाखवली. जसप्रीत बुमराहला दोन षटकार मारत आपला दम दाखवला. पण सॅम कोनस्टासला डिवचण्यासाठी विराट कोहलीने त्याला खांद्याने धक्का मारला. त्यामुळे काही काळ मैदानात तणावाचं वातावरण होतं. सॅम कोनस्टासने या सामन्यात 65 चेंडूत 60 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 2 षटकार मारले. 92.31 च्या सरासरीने धावा केल्या. पण इतर तीन डावात मात्र त्याची बॅट हवी तशी चालली नाही. भारतीय खेळाडूंनी त्याला जितकं दाबता येईल तितकं दाबण्याचा प्रयत्न केला. पण विराट कोहलीने मारलेल्या धक्क्याचं प्रकरण काही थांबता थांबत नाही. या प्रकरणी आता सॅम कोनस्टास स्वत: व्यक्त झाला आहे.

‘विराट कोहलीचे पाय जमिनीवर आहेत. त्याचा स्वभाव खूपच मनमोकळा असून त्याच्याशी मी सामना संपल्यानंतर बोललो. तसेच प्रेरणास्त्रोत असल्याचंही सांगितलं.त्याने मला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीलंका दौरा माझ्यासाठी चांगला असेल असं त्याने सांगितलं. पण मी संघात असलो तर..’, असं कोनस्टासने सांगितलं. ‘माझं कुटुंब विराट कोहलीवर प्रेम करते. मी क्रिकेटचे धडे गिरवताना त्याला आदर्श मानलं आहे. तो एक महान खेळाडू आहे.’, असंही कोनस्टास पुढे म्हणाला.

बुमराह प्रकरणावरही सॅम कोनस्टासने आपलं मत मांडलं. ‘मला अजून थोडा काळ घालवायचा होता. कारण त्यामुळे दुसरं षटक टाकता आलं नसतं. पण बुमराहने सर्व रणनिती उधळून लावली. तो दिग्गज खेळाडू आहे. त्याने 32 विकेट एका मालिकेत घेतल्या आहेत. जर तेच पुन्हा घडलं तर मी कदाचित काहीच बोललो नसतो.’ दरम्यान, पाचव्या कसोटीत जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्याने तिसऱ्या दिवशी मैदानात उतरला नाही. तसेच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याला आराम देण्याची शक्यता आहे. आता बुमराह थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसेल.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.