INDvsAUS : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतून डच्चू, ‘हा’ स्टार खेळाडू खचला

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. तसेच यानंतर 3 मॅचची वनडे सीरिज पार पडणार आहे.

INDvsAUS : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतून डच्चू, 'हा' स्टार खेळाडू खचला
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 9:36 PM

मुंबई : न्यूझीलंड सध्या भारत दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलिया टीम इंडिया विरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघात 4 सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. या 4 पैकी पहिल्या 2 सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा काही दिवसांआधीच केली आहे. तर ऑस्ट्रेलियानेही संपूर्ण मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला संघात स्थान न मिळाल्याने खेळाडू पूर्णपणे खचला आहे. विषय इतका टोकाला गेला की खेळाडूने निवृत्तीचा विचारही मनात आणला.

ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकी गोलंदाज एडम झाम्पावर आघात झाला आहे. आपली टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड होईल, अशी त्याला अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही.

झाम्पाला वगळल्याने त्याच्या कसोटी महत्त्वाकांक्षांना ठेच पोहचल्याचं ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डेव्हिड हसी म्हणाला. हसीने गुरुवारी सेन रेडियोला मुलाखत दिली. यादरम्यान हसी बोलत होता.

हे सुद्धा वाचा

“झाम्पा न्यू साऊथ वेल्सकडून बिग बॅश लीग सुरु होण्याआधी विक्टोरिया विरुद्ध शील्ड मॅच खेळला होता. झाम्पाने चांगली बॉलिंग केली. हेड कोच एंड्रयू मॅकडॉनल्ड आणि निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांच्यानुसार झाम्पा भारत दौऱ्यात जाणाऱ्या संघात असेल.”, असंही हसीने नमूद केलं.

तसेच भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया कसोटी संघात संधी न मिळाल्याने झाम्पा फार वाईट खचला होता. “आगामी काळात एकदिवसीय आणि टी 20 वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचा ठरवलं होतं”असं झाम्पा काही दिवसांपूर्वी म्हणाला होता.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.