IPL 2023 | आयपीएलच्या 16 व्या मोसमाआधी टीमसाठी गूडन्युज, ‘या’ स्टार बॉलरची एन्ट्री

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत दुखापतीमुळे न खेळू शकलेला स्टार बॉलर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मात्र सज्ज आहे.

IPL 2023 | आयपीएलच्या 16 व्या मोसमाआधी टीमसाठी गूडन्युज, 'या' स्टार बॉलरची एन्ट्री
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 7:17 PM

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. या टेस्टसीरिजनंतर उभयसंघात वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आयपीएल 16 व्या मोसमाचं बिगूलही वाजलंय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजनंतर आयपीएल 16 व्या हंगामासाठी खेळाडू हे तयारीला लागणार आहेत. तर इथे बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतून ऑस्ट्रेलियाचे बरेच खेळाडू हे दुखापतीमुळे आऊट झाले आहेत. मात्र आता अशी एक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे या खेळाडूंना देशापेक्षा आयपीएल महत्वाचं आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नक्की काय झालंय?

ऑस्ट्रेलियाचा स्टार बॉलर जोश हेझलवूड हा दुखापतीमुळे बॉर्डर गावसकर कसोटीतून बाहेर पडला. या दुखापतीमुळे हेझलवूडची टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही निवड करण्यात आली नाही. मात्र हा हेझलवूड आयपीएल खेळण्यासाठी फीट आहे.

हेझलवूड याने स्वत: आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तयार असल्याचं स्पष्ट केलंय. हेझलवूड आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्रतिनिधित्व करतो. हेझलवूडच्या दुखापतीमुळे आरसीबी मॅनेजमेंट चिंतेत होतं. मात्र आता हेझलवूड फीट असल्याने टीममध्ये आनंदाचं वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा

तसेच दु्सऱ्या बाजूला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही याच स्थितीत आहे. बुमराह दुखापतीमुळे अनेक महिन्यांपासून टीममधून बाहेर आहे. दुखापतीमुळे त्याला न्यूझीलंड, श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेला मुकावं लागलं.

तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची रविवारी 19 फेब्रुवारीला घोषणा करण्यात आली. मात्र यातही बुमराहचा समावेश करण्यात आला नाही. बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. विशेष बाब म्हणजे मुंबईचा आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिला सामना हा 2 एप्रिल रोजी आहे. मुंबई विरुद्ध आरसीबी यांच्यात हा सामना होणार आहे. त्यामुळे झालंय असं की आतापर्यंत दुखापतग्रस्त असलेले हे खेळाडू आयपीएलसाठी झटकन दुखापतीतून कसे सावरतात, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

आरसीबी टीम | फॉफ डुप्लेसी (कॅप्टन), विराट कोहली, हिमांशु शर्मा, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, अनुज रावत, फिन एलन*, वानिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली*, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर , मोहम्मद सिराज, जोश हेझलवुड, सिद्धार्थ कौल, रीस टॉपले, मनोज वानखेडे, राजन कुमार, अविनाश सिंह, सोनू यादव, आकाश वशिष्ठ आणि आकाश दीप.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.