INDvsAUS | भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीमला मजबूत झटका, 2 खेळाडू ‘आऊट’
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. सीरिजमधील पहिली मॅच ही नागपुरात खेळवण्यात येणार आहे.
नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेत एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. सीरिजमधील पहिला सामना हा महाराष्ट्राची उपराजधानी अर्थात नागपुरात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे 9-13 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे. त्याआधी टीमला मोठा झटका लागला आहे. एका झटक्यात 2 खेळाडू पहिल्या सामन्यातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे टीममध्ये चिंतेचं वातावरण आहे.
ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातून वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बाहेर झाला आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, हेझलवूड अजूनही दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे हेझलवूड पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो.
इतकंच नाही, तर दिल्लीत खेळवण्यात येणाऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध असेल की नाही, याबाबत शंका आहे. हेझलवूडने बंगळुरूतील एलुरमध्ये झालेल्या नेट्स प्रॅक्टीसमध्ये भाग घेतला नाही. या दरम्यान तो आपल्या सहकाऱ्यांची मदत करत होता. पहिल्या सामन्यात स्कॉट बोलँडचा समावेश होऊ शकतो.
ऑस्ट्रेलियासाठी ही वाईट बातमी यासाठीही आहे, कारण आधीच मिचेल स्टार्क नागपूर कसोटीतून बाहेर झाला आहे. हे दोघे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख गोलंदाज आहेत. मात्र हे दोघे आता पहिल्या सामन्यात नसल्याने ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरु शकते.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा
चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.