कॅप्टन रोहित शर्मा याला महेंद्रसिंह धोनी याचा तो महारेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

बॉर्डर गावसकर ट्रॉफीत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत रोहितला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

कॅप्टन रोहित शर्मा याला महेंद्रसिंह धोनी याचा तो महारेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 6:15 PM

इंदूर | बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा 1 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये करण्यात आलंय. टीम इंडिया 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. तर ऑस्ट्रेलिया अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. टीम इंडियासाठी तिसरी कसोटी अनेक बाबतीत महत्वाचा आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी आहे. रोहितला ही 1 मॅच जिंकून कॅप्टन आणि टीम म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी

रोहितला तिसरा कसोटी सामना जिंकून टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. याआधी धोनी आणि पाकिस्तान बाबर आझम या दोघांनीच कसोटी क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून पहिले 4 सामने जिंकले आहेत. तर रोहितच्या नेतृत्वातही टीम इंडियाने 4 टेस्ट जिंकल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाने इंदूर टेस्ट जिंकली, तर रोहित धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करेल. तसेच रोहित कर्णधार म्हणून पहिले सलग 5 कसोटी सामने जिंकणारा खेळाडू ठरेल.

रोहितचा कॅप्टन्सीचा रेकॉर्ड

रोहितने आतापर्यंत कसोटीत एकूण 4 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलंय. यातील 2 सामने हे सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील आहे, ज्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. तर याआधी 2 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला आहे. श्रीलंका 2022 मध्ये भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हा टीम इंडियाने श्रीलंकेला रोहितच्या कॅप्टन्सीत पराभूत केलं होतं.

हे सुद्धा वाचा

रोहितचं कॅप्टन म्हणून पदार्पण आणि विजय

रोहितने 4 मार्च 2022 रोजी श्रीलंकेविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पण केलं. रोहित यासह कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण करणारा टीम इंडियाचा 8 वा खेळाडू ठरला. रोहितने वयाच्या 34 वर्ष 308 दिवशी कर्णधारपदाची सूत्रं हातात घेतली.

हा सामना पंजाबमधील मोहाली इथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 1 डाव आणि 222 धावा अशा मोठा फरकाने विजय मिळवला होता. त्यानंतर श्रीलंकेचा मालिकेतील दुसरा सामना हा बंगळुरुत खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने 238 धावांनी लंकादहन केली होती.

त्यानंतर टीम इंडियाने रोहितच्या कॅप्टन्सीत बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये पराभूत केलं. यामध्ये नागपूरमधील पहिल्या सामन्यात कांगारुंवर 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या टेस्टमध्ये 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

तिसरा विजय आणि फायनलचं तिकीट

टीम इंडियासाठी इंदूर कसोटी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबानेही महत्वाची आहे. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यास डब्ल्यूटीस फायनलचं तिकीट कन्फर्म होईल. यासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात दुसऱ्यांदा पोहचणारी पहिलीच टीम ठरेल. टीम इंडिया याआधी 2021 मध्ये फायनलमध्ये पोहचली होती. तेव्हा न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.