INDvsAUS | टीम इंडियाचा हा क्रिकेटर खेळतोय गल्ली क्रिकेट, व्हीडिओ व्हायरल
टीम इंडियासाठी अहमदाबादमधील चौथा कसोटी सामना हा करो या मरोचा आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचा क्रिकेटर गल्ली क्रिकेट खेळताना दिसला.
मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा आणि शेवटचा सामना हा 9 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी (पूर्वी मोटेरा स्टेडियम) स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही हजर असणार आहेत. तसेच टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने चौथी कसोटी अतिशय महत्वाची आहे. अशी परिस्थिती असताना टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू चक्क गल्ली क्रिकेट खेळताना कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
गल्ली क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव
एका बाजूला टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. तर दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादव गल्ली क्रिकेट खेळताना दिसतोय. या व्हीडिओत पब्लिक डिंमाडनुसार सूर्या त्याचा ट्रेड मार्क सुपळा शॉट मारताना दिसतोय. हा व्हीडिओ मुंबई इंडियन्सने ट्विट केला आहे. सूर्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मात्र हा व्हीडिओ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीआधीचा आहे की नाही, याबाबत नक्की माहिती नाही.
सूर्यकुमार यादव गल्ली क्रिकेटमध्ये तल्लीन
The iconic…. ????? ???? ft. सूर्या दादा ?
?: Roshan Singh#OneFamily @surya_14kumar pic.twitter.com/ohrBH8jbmG
— Mumbai Indians (@mipaltan) March 6, 2023
सूर्या टेस्टमध्ये फेल
सूर्याने या मालिकेतील पहिल्या म्हणजेच नागपूर कसोटीतून पदार्पण केलं. मात्र त्याला टी 20 आणि वनडे प्रमाणे टेस्टमध्ये छाप सोडता आली नाही. सूर्याने या सामन्यातील पहिल्या डावात अवघ्या 8 धावाच केल्या. या सामन्यात टीम इंडियाने 1 डावाने विजय मिळवला होता. सूर्याला त्यानंतर दिल्ली आणि इंदूर कसोटीत संधी देण्यात आली नाही. सूर्याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यर याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला.
दरम्यान उभयसंघात कसोटी मालिकेनंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या वनडे सीरिजमध्ये सूर्यकुमार यादव याची निवड करण्यात आली आहे. या मालिकेत सूर्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई
दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम
तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई
या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.