INDvsAUS | ‘मी दाखवून देईन…’, टीममध्ये स्थान न मिळाल्याने हा बॅट्समन भडकला
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये निवड समितीने त्रिशतक ठोकलेल्या फलंदाजाला वगळलं. त्यामुळे खेळाडूने रोष व्यक्त केला आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलिया टीम भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया टीम इंडिया विरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील सलामीचा सामना हा 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. सामन्याचं आयोजन हे नागपूरमध्ये करण्यात आलं. एकाबाजूला ऑस्ट्रेलियाने 4 कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केलाय. तर टीम इंडियाने 2 सामन्यांसाठीच भारतीय संघाची घोषणा केलीय. यामध्ये एका युवा खेळाडूला चांगल्या कामगिरीनंतरही संधी न दिल्याने त्याला आपला संताप व्यक्त केला आहे. या स्टार बॅट्समनच्या विधानाची क्रिकेट विश्वात चर्चा रंगली आहे.
मुंबईकर फलंदाज सरफराज खान हा सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याने देशांतर्गत स्पर्धेत विरोधी संघातील गोलंदाजांची अक्षरक्ष पिसं काढली. त्याने त्रिशतकही ठोकलं. सरफराजला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिडल ऑर्डरमधील दावेदार म्हणून पाहिलं जात होतं. मात्र त्यानंतरही निवड समितीने त्याचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटींमध्ये समावेश केला नाही.
सरफराज खान काय म्हणाला?
सरफराज खान टीम इंडियाचा माजी खेळाडू आकाश चोपडा याच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होता. या कार्यक्रमात त्याने विविध प्रश्नांची उत्तरं दिली. या कार्यक्रमात सरफराजने सांगितलं की इतर लोकं कसे सांगायचे की हा कसा फक्त टी 20 आणि वनडे क्रिकेटसाठीच योग्य आहे.
सरफराज काय म्हणाला?
“जेव्हा मी वर्ल्ड कप खेळून परतलो आणि 1-2 वर्ष आयपीएलमध्ये खेळलो. तेव्हा काही जण म्हणाले की सरफराज व्हाईट बॉल क्रिकेट (वनडे-टी 20) प्लेअर आहे, तो रेड बॉलसाठी (टेस्ट) योग्य नाही. पण मला माहिती होतं की मी हे करु शकतो. मी यासाठी कठोर परिश्रम घेतोय”, असं सरफराज म्हणाला.
“मी संधीच्या शोधात होतो, जिथे मला सलग 4-5 सामन्यात खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे मी दाखवेन की मी कोण आहे. जेव्हा तो दिवस आला, मी मुंबईसाठी कमबॅक केलं. माझं मुंबईसाठीचं पहिलं शतक हे त्रिशतकात बदललं. त्यानंतर मला जाणीव झाली की काही गोष्टी या तितक्या अवघड नसतात. मुंबईसाठी खेळावं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं”, असं सरफराज म्हणाला.
सरफराजच्या कामगिरीचं ‘मिस्टर 360’ म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर एबीडी व्हीलियर्स याने कौतुक केलं होतं. सरफराजने एबीचाही या कार्यक्रमात उल्लेख केला.
कदाचितत मी एबीला सराव करताना पाहिलं. पण मी त्याला एकदा विचारलं की तुम्ही फार सराव का नाही करत? त्यावर एबी म्हणाला की, मी तुझ्या वयाचा असताना फार सराव केला. तसेच मी तुझ्या इतका प्रतिभावान नव्हतो जितका तु आज आहेस, त्यामुळे फक्त खेळत रहा”, असं एबीसोबत बोलणं झालं असल्याचं सरफराज म्हणाला.