Video : IND vs AUS | विराट कोहली याच्या द्विशतक करण्याच्या घाईत उमेश यादवचा बळी
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यामध्ये विराट कोहलीची द्विशतक करण्याची घाई उमेश यादवच्या अंगाशी आली. उमेश यादव आला आणि फक्त हजेरी लावून गेला.
मुंबई : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटीमध्ये शतक झळकवलं. विराट कोहलीला या शतकासाठी तब्बल 1204 दिवसांची वाट पाहावी लागली. या सामन्यामध्ये कोहलीला द्विशतक करण्याची संधी होती मात्र अवघ्या 14 धांवानी त्याचं द्विशतक हुकलं. कोहली 186 धावांवर बाद झाला मात्र त्याच्या द्विशतकाची घाई उमेश यादवच्या अंगाशी आली. उमेश यादव आला आणि फक्त हजेरी लावून गेला.
आर. आश्विन आऊट झाल्यावर मैदानामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आला होता. भारताचे माजी कोच रवी शास्त्री समालोचन करताना अनेकवेळा उमेश यादवला मिस्टर स्ट्राँगी म्हणून बोलतात. कारण आपल्या ताकदीच्या जोरावर उमेश समोरचा बॉलर कोण आहे हे न पाहता आक्रमण करत गगनचुंबी सिक्सर मारतो तर अनेकवेळा शेवटला येत छोटेखानी खेळी करत भारताच्या धावसंख्येत भर घालतो.
पाहा व्हिडीओ-
— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) March 12, 2023
रविवारीही उमेशकडून अशाच फटक्यांची अपेक्षा चाहत्यांना होती मात्र कोहलीच्या दोन धावांच्या कॉलमुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली. ज्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलिअन स्पिनर मर्फीच्या षटकातील तिसरा चेंडू लेग साईडला कोहलीने मारला आणि उमेशला दोन धावा घेण्यासाठी कॉल दिला. कोहली सुसाट सुटला पण नॉन-स्ट्रायकरला असलेला उमेश धावबाद झाला. पीटर हँड्सकॉम्बचा सीमारेषेवरून मारलेला थ्रो थेट स्टंपवर बसला.
उमेश यादवला एकही चेंडू न खेळता माघारी परतावं लागलं. भारताचा मिस्टर स्ट्राँगी एकही चेंडू न खेळता पॅव्हेलिअनमध्ये गेला. उमेश यादवने त्याची ताकद दाखवून दिली आहे. इंग्लंड ऑस्ट्रेलियासारख्या देशात जाऊन त्याने लांब लांब सिक्सर मारले आहेत. इतकंच नाहीतर कसोटीमध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याच्यादीमध्ये त्याने सिक्सर किंग युवराज सिंगलाही मागे टाकलं आहे.
दरम्यान, भारताचा पहिल डाव 571 धावांवर आटोपला असून तळाला फलंदाजीला येत अक्षर पटेल यानेही 79 धावांची महत्त्वाची खेळी करत धावसंख्या वाढवली. कांगारूंनी दुसऱ्या डावाला सुरूवात केली असून एकही विकेट न गमावता 3 धावा केल्या आहेत. भारताकडे 88 धावांची आघाडी आहे.