CWC 23 IND vs AUS, Virat Kohli याचा वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात महारेकॉर्ड
Virat Kohli India vs Australia Icc World Cup 2023 | विराट कोहली टीम इंडियाची रनमशीन म्हणून ओळखला. जातो. विराटने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. विराटने वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात आता मोठा पराक्रम केला आहे.
चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. वर्ल्ड कपमधील आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. पॅट कमिन्स याने आम्ही पहिले बॅटिंग करणार असल्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श ही सलामी जोडी मैदानात आली. ऑस्ट्रेलियाच्या या सलामी जोडीने पहिल्या 2 ओव्हरपर्यंत सावध सुरुवात केली. त्यानंतर यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाच्या डावातील तिसरी ओव्हर टाकायला आला.
जसप्रीत बुमराह याने या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कांगारुंना पहिला झटका दिला. बुमराहने धोकादायक मिचेल मार्श याला आऊट केलं. मिचेल मार्श याचा स्लिपमध्ये असलेल्या टीम इंडियाच्या विराट कोहली याने अफलातून कॅच घेतला. विराटने डाईव्ह मारत मार्शचा कॅच घेतला. मार्शला टीम इंडिया विरुद्ध भोपळाही फोडता आला नाही. मार्श 6 बॉल खेळून झिरोवर माघारी परतला. तर विराट कोहली याने मार्शची कॅच घेत वर्ल्ड कपमध्ये मोठा रेकॉर्ड केला आहे.
विराट कोहली याचा महारेकॉर्ड
विराट कोहली याने आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये महारेकॉर्ड केला आहे. विराट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक कॅचेस घेणारा पहिला भारतीय ठरला आहे. विराटच्या नावावर आता वर्ल्ड कपमध्ये 15 कॅचची नोंद झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
विराट विक्रम बीसीसीआयचं ट्विट
Milestone Unlocked! 🔓
Virat Kohli now has most catches for India in ODI World Cups as a fielder 😎#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/HlLTDqo7iZ
— BCCI (@BCCI) October 8, 2023
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे भारतीय
विराट कोहली – 15*. अनिल कुंबळे – 14. कपिल देव – 12. सचिन तेंडुलकर.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.