IND vs AUS W T20 Semi Final | टीम इंडियावर 5 धावांनी विजय, ऑस्ट्रेलियाची 7व्यांदा फायनलमध्ये धडक

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 167 धावाच करता आल्या.

IND vs AUS W T20 Semi Final |  टीम इंडियावर 5 धावांनी विजय, ऑस्ट्रेलियाची 7व्यांदा फायनलमध्ये धडक
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 10:12 PM

न्यूलँड्स | टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. वूमन्स ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये 5 धावांनी मात केली आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाची ही अंतिम फेरीत पोहचण्याची एकूण सातवी वेळ ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 167 धावाच करता आल्या.

टीम इंडियाचं या पराभवासह वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं.  वर्ल्ड कप 2020 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यानंतर आता कांगारुंनी सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव केला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या जुन्या जखमेवर नव्याने मीठ चोळलं गेलंय.

भारताचा डाव

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. शफाली वर्मा या सामन्यात अपयशी ठरली. 9 या धावसंख्येवर आता पायचीत होत तंबूत परतली. त्यानंतर स्मृती मंधाना देखील अवघ्या दोन धावा करून बाद झाली. त्यानंतर यास्तिका भाटिका धावचीत झाल्याने तिच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर चौथ्या गड्यासाठी जेमिमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरनं डाव सावरला. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिक्स चुकीचा फटका 43 या धावसंख्येवर परतली. त्यानंतर हरमनप्रीत कौरची खेळी सुरुच होती. पण धावचीत झाल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा मावळल्या. दीप्ती शर्मानं डाव सावरला खरा पण तिलाही स्नेह राण , राधा यादव यांची साथ मिळाली नाही. अखेर हा सामना भारताने 5 धावांनी गमावला.

ऑस्ट्रेलियाची इनिंग

ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. कांगारुंकडून बेथ मूनी हीने सर्वाधिक 54 धावांची अर्धशतकी खेळी केली.कॅप्टन लॅनिंगने नाबाद 49 धावा केल्या. ओपनर हिलीने 25 रन्स ठोकल्या. तर गार्डनरने 31 धावांच योगदान दिलं. ग्रेस हॅरीस 7 धावांवर बाद झाली. टीम इंडियाकडून शिखा पांडे हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर राधा यादव आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

या निर्णायक सामन्यात टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. तर ऑस्ट्रेलियानेही 1 बदल केला आहे.

टीम इंडियात पूजा वस्त्राकर आणि राजेश्वरी गायकवाड यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.पूजा वस्त्राकरची प्रकृती ठीक नाही. तसेच राजेश्वरीला बाहेर बसवण्यात आलं आहे. स्नेह राणा हीला संघात संधी मिळाली आहे. तर राजेश्वरीच्या जागी राधाचा समावेश करण्यात आला होता.

INDvsAUS,  Team India Playing 11 | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव आणि रेणूका सिंह.

Australia Playing 11 | मेग लॅनिंग (कर्णधार),बेथ मूने, अलिसा हीली (विकेटकीपर), अशले गार्डनर, इलिस पेरी, तहिला मॅग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वारेहम, जेस जोनस्सेन, मेगन स्कूट आणि डार्सी ब्राउन.

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.