लंडन : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आमने-सामने आहे. WTC Final 2023 चा किताब जिंकण्यासाठी दोन्ही टीम्समध्ये सामना सुरु आहे. काल कसोटीचा पहिला दिवस होता. फायनलच्या पहिल्या दिवशी प्रेक्षक स्टँडमधला एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह यांच्यातील भांडण मिटल्याची चर्चा रंगली आहे.
अनुष्का आणि रितिकामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा होती. 2019 मध्ये रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना अनफॉलो केलं. त्यानंतर विराट आणि अनुष्काने उपरोधिक मेसेज पोस्ट केला होता. त्यामुळे विविध अफवा पसरल्या होत्या.
दोघींबद्दल रवी शास्त्री यांनी उत्तर देणं टाळलं
4 वर्षापूर्वी एका पत्रकार परिषदेत रितिका आणि अनुष्काबद्दल प्रश्न सुद्धा विचारण्यात आले होते. त्याची उत्तर देणं रवी शास्त्री यांनी टाळलं होतं. त्यानंतर रितिका आणि अनुष्का फार कमीवेळा सोबत दिसल्या. दोघी स्टेडियममध्ये उपस्थित रहायच्या. पण वेगवेगळ्या बसत होत्या.
रितिका अनेकदा आपल्या गर्ल्स गँगसोबतचे मॅचचे फोटो शेयर करायची. त्या फोटोंमध्ये अनुष्का कधी दिसली नाही.
Anushka Sharma in the stands at the Oval. pic.twitter.com/tbonM2aGB4
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) June 7, 2023
आगीसारखा व्हायरल झाला फोटो
आता बऱ्याच काळानंतर लंडनमध्ये दोघी एकाच फ्रेममध्ये दिसल्या आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर दोघींमधील भांडण मिटल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. सोशल मीडियावर दोघींचा एकाच स्टँडमधील फोटो आगीसारखा व्हायरल झालाय. रोहितने कालच्या सामन्यात टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. पहिल्या दिवसाच्या खेळात टीम इंडिया बॅकफूटवर आहे.
पहिल्या दिवसाच्या खेळात काय स्थिती?
ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या खेळात 85 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 327 धावा केल्या आहेत. ट्रेव्हिसने 156 बॉलमध्ये 22 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 146 धावा केल्या, तर स्टीव्हन स्मिथ शतकाच्या उंबरठ्यावर आहे.