WTC Final 2023 | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा कधी?

टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा धडक मारली आहे. टीम इंडियाचा पहिल्या वेळेस न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. मात्र आता टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन होण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.

WTC Final 2023 |  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा कधी?
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 8:12 PM

मुंबई | क्रिकेट विश्वासाठी आजचा दिवस फार महत्वाचा ठरला. न्यूझीलंडने थरारक झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा 2 विकेट्सने पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयामुळे टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीशप फायनलमध्ये एन्ट्री झाली. टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पाचव्या दिवसाच्या दरम्यान या ही गूडन्युज मिळाली. पाचव्या दिवसाचा खेळ संपला आणि चौथा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे टीम इंडियाने ही मालिका 2-1 च्या फरकाने जिकंली. टीम इंडियाचा हा भारतातील सलग 16 वा तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा मालिका विजय ठरला.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा पोहचणारी पहिलीच टीम ठरली आहे. टीम इंडियाला पहिल्यांदा न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे टीम इंडियाचं स्वप्न भंगलं होतं. मात्र आता त्याच न्यूझीलंडने टीम इंडियाचा मार्ग मोकळा केला.

हे सुद्धा वाचा

आता टीम इंडियाचा सामना हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रलिया विरुद्ध होणार आहे. हा सामना 7 जूनपासून इंग्लंडमधील द ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, तो म्हणजे या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 फायनल हा सामना 18 ते 23 जून दरम्यान खेळवण्यात आला होता. या फायनलसाठी बीसीसीयाने भारतीय संघाची घोषणा ही 15 जून रोजी म्हणजे 3 दिवसांआधी करण्यात आली होती. तर आता 7 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे या फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा जून महिन्याच्या पहिल्या 2 दिवसात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. मात्र यंदा श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह यासारखे अनेक खेळाडू हे दुखापतीने त्रस्त आहेत. त्यामुळे बीसीसीआय एकूण किती सदस्यीय संघाची घोषणा करते याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी अशी होती टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.