IND vs BAN : पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून या खेळाडूचं पदार्पण?
India vs Bangladesh 1st T20i: टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघ टी 20i मालिकेसाठी सज्ज आहेत. टीम इंडियाकडून पहिल्या सामन्यातून युवा गोलंदाजाला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेला रविवार 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होत मालिकेतील सलामीचा सामना ग्वाल्हेर येथील माधवराव शिंदे स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. नजमुल हुसैन शांतो बांगलादेशची कॅप्टन्सी करणार आहे. सूर्याची पूर्ण वेळ कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बांगलादेश विरुद्धची ही पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाची युवा ब्रिगेड या मालिकेसाठी उत्सूक आहे. तसेच वेगवान गोलंदाज मयंक यादव याला पहिल्या सामन्यातून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. आता टीम मॅनेजमेंट मयंकवर विश्वास दाखवून संधी देणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
ओपनिंग जोडी ठरली
या मालिकेसाठी यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या युवा आणि सलामी फलंदाजांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अभिषेक शर्मा याच्या सोबतीला ओपनिंग कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र कॅप्टन सूर्याने सामन्याच्या पूर्वसंध्येला अभिषेक शर्मा याच्यासह विकेटकीपर संजू सॅमसन ओपनिंग करणार असल्याचं निश्चित झालं आहे. तसेच जितेश शर्माला संधी मिळणार नसल्याचंही स्पष्ट झालं आहे.
शिवम दुबे ‘आऊट’
दरम्यान टीम इंडियाचा ऑलराउंडर शिवम दुबे पाठीच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघात युवा तिलक वर्मा याच्या समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.