IND vs BAN: अश्विन-जडेजाची निर्णायक भागीदारी, टीम इंडियाच्या पहिल्या डावात 376 धावा, हसन महमूदचा ‘पंजा’

India vs Bangladesh 1st Test R Ashwin And Ravindra Jadeja : बांगलादेशने दुसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक करत टीम इंडियाचे उर्वरित 4 विकेट्स झटपट घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाचा डाव हा 376 धावांवर आटोपला.

IND vs BAN: अश्विन-जडेजाची निर्णायक भागीदारी, टीम इंडियाच्या पहिल्या डावात 376 धावा, हसन महमूदचा 'पंजा'
r ashwin and ravindra jadeja ind vs ban 1st testImage Credit source: Bcci x Account
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 11:14 AM

टीम इंडियाचा बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिला डाव हा दुसऱ्या दिवशी 376 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 80 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 339 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी 37 धावांच्या मोबदल्यात झटपट 4 विकेट्स गमावल्या. टीम इंडियाने या 4 विकेट्स पहिल्या 75 मिनिटात गमावल्या. त्यामुळे बांगलादेश टीम इंडियाला 400 च्या आत रोखण्यात यशस्वी ठरली. टीम इंडियासाठी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने सातव्या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाला 375 पार मजल मारता आली. बांगलादेशकडून हसन महमूद याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

रवींद्र जडेजा 86* आणि आर अश्विन 102* धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र जडेजा 86 धावांवरच आऊट झाला. त्यानंतर आकाश दीप 17 धावा करुन माघारी परतला. आर अश्विन याने 133 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 113 धावांची खेळी केली. त्यानंतर जसप्रीत बुमराह 7 धावांवर आऊट झाला यासह भारताचा डाव हा 91.2 षटकांमध्ये आटोपला.

त्याआधी पहिल्या दिवशी बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रोहित शर्मा 6, शुबमन गिल 0 आणि विराट कोहली 6 धावा करुन बाद झाले. त्यामुळे टीम इंडियाची 3 बाद 34 अशी स्थिती झाली. त्यानंतर ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने चौथ्या विकेटसाठी 62 धावा जोडल्या. त्यानतंर पंत 52 बॉलमध्ये 39 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर टीम इंडियाने सलग 2 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावल्या. यशस्वी आणि केएल राहुल आऊट झाले. यशस्वीने 56 आणि केएलने 16 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 6 बाद 144 अशी स्थिती झाली होती.

अश्विन-जडेजाची भागीदारी

अश्विन-जडेजा या अनुभवी जोडीने अडचणीत असलेल्या टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी पहिल्या दिवसापर्यंत सातव्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. त्यामुळे या जोडीकडून दुसऱ्या दिवशी मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र दुसऱ्या दिवशी बांगलादेशने भारताला रोखलं. बांगलादेशकडून हसन महमूद याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तास्किन अहमद याने तिघांना आऊट केलं. तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराज याला माघारी पाठवलं.

बांगलादेशने भारताला 400 च्या आत रोखलं

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.