Rishabh Pant vs Litton Das : “.. भाई मला का मारतोय?” पंत-लिटन दास भिडले, व्हीडिओ व्हायरल

Rishabh Pant and Litton Das Argument Video: टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आणि बांगलादेशचा विकेटकीपर लिटन दास यांच्यात वाद झाला आहे. पाहा व्हायरल व्हीडिओ

Rishabh Pant vs Litton Das : .. भाई मला का मारतोय? पंत-लिटन दास भिडले, व्हीडिओ व्हायरल
Rishabh Pant and Litton Das Argument
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 2:00 PM

टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याचं बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये 20 महिन्यांनी पुनरागमन झालं. पंतला बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या सामन्यात फार लवकरच मैदानात यावं लागंल. टीम इंडियाने 34 धावांवर 3 विकेट्स गेल्याने पंतला मैदानात यावं लागंल. बॅटिंगदरम्यान पंत आणि बांगलादेशचा विकेटकीपर लिटन दास या दोघांमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. पंत आणि दासने एकमेकांना काय म्हटलं? दोघेही मैदानात कोणत्या मुद्द्यावरुन भिडले? या संपूर्ण प्रकरणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

कॅप्टन रोहित शर्मा 6, शुबमन गिल 0 आणि विराट कोहली 6 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत हे दोघेही खेळत होते. पंत जोरदार फटकेबाजी करत होते. या दरम्यान 16 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर यशस्वी जयस्वालने फटका मारुन 1 धाव घेतली. पंत दुसरी धावही घेण्याच्या प्रयत्नात होता. मात्र यशस्वीने पंतला नकार देत मागे पाठवलं. या दरम्यान फिल्डरने बॉल फेकला. फिल्डिरने विकेटकीपरच्या दिशेने फेकलेला बॉल हा पंतच्या पॅडला लागला. त्यामुळे बॉलची दिशा बदलली. पंतला बॉलला लागल्याने त्याने नाराजी बोलून दाखवली. “त्याच्या दिशेने फेकना मला का मारतोय?”, असं पंत दासला बोलला. त्यावर दासनेही पंतला उत्तर दिलं. “तो तर मारणार ना”, असं दास म्हणून मागे निघून गेला. पंत आणि दास या दोघांमध्ये झालेल्या या वादावादीचा व्हीडिओ व्हायरल झालाय.

दरम्यान पंतने टीम इंडिया अडचणीत असताना यशस्वी जयस्वालला चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी करत काही वेळ टीम इंडियाचा डाव सावरला. पंतलाही चांगली सुरुवात मिळाली. पंत अर्धशतकाच्या दिशेने आगेकूच करत होता. मात्र पंत आऊट झाला. पंतला हसन महमूद याने आऊट करत टीम इंडियाला चौथा झटका दिला. पंत आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 25.3 ओव्हरमध्ये 4 आऊट 96 अशी झाली. पतने 52 बॉलमध्ये 6 फोरसह 39 रन्स केल्या.

पंत-दास यांच्यात काय झालं?

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.