Rishabh Pant चं दणक्यात कमबॅक, बांगलादेश विरुद्ध अर्धशतकी खेळी, टीम इंडिया भक्कम स्थितीत
Rishabh Pant Fifty: टीम इंडिायाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने कमबॅकनंतर 638 दिवसांनी अर्धशतक ठोकलंय. पंतने अर्धशतकी खेळीनंतर फटकेबाजीला सुरुवात केली.
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने 20 महिन्यानंतरं दणक्यात कमबॅक केलं आहे. ऋषभ पंतने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावलं आहे. पंतने चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये कसोटी कारकीर्दीतील 12 वं अर्धशतक पूर्ण केलंय. पंतने या खेळीदरम्यान काही खास फटके मारले. त्यापैकी एक म्हणजे एकहाती मारलेला षटकार. पंतने या दरम्यान चौफेर फटकेबाजी केली. तसेच शुबमन गिलला चांगली साथ देत टीम इंडियाला आणखी भक्कम स्थितीत आणून ठेवलं. त्यामुळे टीम इंडियाला 400 पेक्षा अधिक धावांची सहज आघाडी घेता आली.
पंतने दुसर्या डावातील 44 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं. पंतने 88 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केलं. पंत अर्धशतकानंतर आणखी आक्रमक झाला. पंतने टॉप गिअर टाकत आणखी जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. पंतने या फटकेबाजीच्या जोरावर शुबमन गिल आणि त्याच्या धावातील अंतर आणखी कमी केलं. या जोडीने शानदार पद्धतीने बॅटिंग करत पहिलं सत्र भारताच्या नावावर केलं. भारताने पहिल्या सत्रात एकही विकेट गमावली नाही.
पंतचा एकहाती षटकार
PANT IS BACK.
ONE-HANDED SIX IS BACK.
Test cricket is kicking again in India. pic.twitter.com/8QnZxjpGnE
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2024
भारताने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 124 धावा जोडल्या. पंत आणि गिल या जोडीने चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत 190 बॉलमध्ये 138 रन्सची पार्टनरशीप केली आहे. गिलचं या भागीदारीत 55 धावांचं योगदान आहे. तर पंतने 82 धावा जोडल्या आहेत. यावरुन पंत काय वेगाने खेळलाय, याचा अंदाज येतो. दरम्यान आता टीम इंडिया किती धावांवर आपला डाव घोषित करणार? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पहिलं सत्र भारताच्या नावावर
Lunch on Day 3 of the 1st Test.#TeamIndia 205/3
Shubman Gill and Rishabh Pant amass 124 runs in the morning session.
Scorecard – https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/4qRa6Cvc1i
— BCCI (@BCCI) September 21, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.