R Ashwin : आर अश्विनचा शतकांचा ‘सिक्सर’, घरच्या मैदानात रेकॉर्ड्सची रांग
R Ashwin Century : आर अश्विनने 3 वर्षांनंतर घरच्या मैदानात शतक करत टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहचवलं आहे. अश्विनच्या कसोटी कारकीर्दीतील हे एकूण सहावं तर बांगलादेश विरुद्धचं पहिलं शतक ठरलं आहे. अश्विनने यासह काही खास विक्रम केले आहेत.
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर आर अश्विन याने आपल्या घरच्या मैदानात धमाका केला आहे. अश्विनने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकलं आहे. अश्विनच्या कसोटी कारकीर्दीतील हे सहावं तर घरच्या मैदानातील दुसरं शतक ठरलं आहे. अश्विनच्या कसोटी कारकीर्दीतील हे सर्वात वेगवान शतक ठरलं. एम ए चिदंरबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात अश्विनने शानदार बॅटिंग केली. बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याने टीम इंडियाच्या डावातील 78 वी ओव्हर टाकली. अश्विनने या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर एकेरी धाव घेत शतक झळकावलं. अश्विनने 108 बॉलमध्ये 10 चौकार आणि 2 सिक्ससह हे शतक केलं.
अश्विनने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी मैदानात घट्ट पाय रोवले आणि रवींद्र जडेजा याच्यासह डाव सावरला. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 80 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 339 धावा केल्या. अश्विन 112 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 10 फोरसह 102 रन्सवर नॉट आऊट परतला. तर जडेजाने 117 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 86 धावा केल्या आहेत. जडेजा आणि अश्विन या जोडीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 व्या विकेटसाठी 195 धावांची नाबाद भागीदारी केली. तसेच अश्विनने या शतकांसह काही विक्रम आपल्या नावावर केले.
शतकासह काही खास विक्रम
अश्विन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 500 विकेट्स आणि 6 शतकं करणारा एकमेव खेळाडू आहे. तसेच आर अश्विन आणि जडेजा या दोघांमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. तसेच अश्विन आठव्या किंवा त्यापेक्षा खालच्या स्थानी येऊन सर्वाधिक शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. अश्विनचं हे सातव्या किंवा त्याखाली येत शतक करण्याची चौथी वेळ आहे. तर हा विक्रम न्यूझीलंडचा माजी खेळाडू डॅनियल व्हीटोरी याच्या नावावर आहे. व्हीटोरीने 5 शतकं केली आहेत.
तसेच अश्विनने घरच्या मैदानात 2021 नंतर हे शतक केलं आहे. अश्विनने फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियममध्ये शतक केलं होतं. अश्विनने याआधी 2011 साली विंडिज विरुद्ध 117 बॉलमध्ये वेगवान शतक केलेलं. तर इंग्लंड विरुद्ध 124 चेंडूत शेकडा पूर्ण केलं होता. तर आता अश्विनने फक्त 108 चेंडूत हा कारनामा केला आहे.
आर अश्विनचा शतकी जल्लोष
A stellar TON when the going got tough!
A round of applause for Chennai’s very own – @ashwinravi99 👏👏
LIVE – https://t.co/jV4wK7BgV2 #INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/j2HcyA6HAu
— BCCI (@BCCI) September 19, 2024
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.