IND vs BAN Test : बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर संपुष्टात, मोमिनुल हकची चिवट खेळी

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला. 107 धावांवर 3 गडी बाद अशी सुरुवात चौथ्या दिवशी झाली होती. 126 धावांवर 7 गडी बाद करण्यात टीम इंडियाला यश आलं. तर मोमिनुल हकने नाबाद शतकी खेळी करत चिवट झुंज दिली.

IND vs BAN Test : बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर संपुष्टात, मोमिनुल हकची चिवट खेळी
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 1:24 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशी अतिरिक्त वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे बांगलादेशला झटपट बाद करण्याचं आव्हान होतं. पण मोमिनुल हकने एका बाजून चिवट झुंज दिली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या बाजूने विकेट घेण्याशिवाय पर्याय नव्हता आणि झालंही तसंच. मोमिनुल हक शेवटपर्यंत नाबाद 107 धावांवर राहिला. तर दुसऱ्या बाजूने 7 विकेट पडल्या. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिली विकेट मिळवून दिली. मुशफिकुर रहमानला 11 धावांवर असताना त्रिफळाचीत केलं. त्यानंतर एक एक करत इतर फलंदाजांना बाद करण्यात टीम इंडियाला यश आलं. लंच ब्रेकनंतर तीन गडी झटपट बाद केले आणि बांगलादेशचा खेळ 233 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर मोहम्मद सिराज, आर अश्विन आणि आकाश दीपने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाला एक गडी बाद करण्यात यश आलं. बांगलादेशचा खालिद अहमद हा रवींद्र जडेजाचा कसोटी क्रिकेटमधील 300 वा बळी ठरला. त्याच्या विकेटसह बांगलादेशचा कानपूर कसोटीतील पहिला डाव संपुष्टात आला.

बांगलेशकडून झाकीर हसन आणि खालिद अहमद यांना आपलं खातंही खोलता आलं नाही. शदमन इस्लामन 24, नजमुल होसेन शांतो 31, मुशफिकुर रहमान 11, लिटन दास 13, शाकीब अल हसन 9, मेहिदी हसन मिराज 20, तैजुल इस्लाम 5, हसन मेहमुद 1 या धावसंख्येवर बाद झाले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

शरद पवार यांचं सरकार येणार? अनौपचारिक गप्पांमध्ये काय म्हणाले शरद पवार
शरद पवार यांचं सरकार येणार? अनौपचारिक गप्पांमध्ये काय म्हणाले शरद पवार.
'दीड-दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'दीड-दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
आता देशी गाय 'राज्यमाता', राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
आता देशी गाय 'राज्यमाता', राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय.
'काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा', विरोधकांच्या टीकेवर केसकरांचं उत्तर
'काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा', विरोधकांच्या टीकेवर केसकरांचं उत्तर.
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा.
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्...
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्....
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?.
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?.
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून...
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून....
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ.