Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1..2..3..4..! कसोटीच्या एका डावात भारताने रचले इतके विक्रम, जाणून घ्या एका क्लिकवर

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा पहिल्या डावात भारताने आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला. पण त्याची कसर भारतीय संघाने चौथ्या दिवशी भरून काढली. इतकंच काय तर कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे.

| Updated on: Sep 30, 2024 | 5:19 PM
कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. भारताने 9 गडी गमवत 285 धावांवर डाव घोषित केला. यावेळी भारताकडे 52 धावांची आघाडी होती. टीम इंडियाने अवघ्या 34.4 षटकांत या 285 धावा केल्या. यासह विक्रमांची रांग लावली आहे.

1 / 6
 कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 3 षटकात 50 धावा करणारी पहिली टीम ठरली आहे. इतकंच काय तर  कसोटीत 10.1 षटकात 100 धावांचा पल्ला गाठण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताच्या नावाव होता. हा विक्रम होत नाही तोच कसोटीत 24.2 षटकात 200 धावा करणारा पहिला संघ म्हणून मान मिळवला.

2 / 6
यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक रूप दाखवलं होतं. या जोडीने कसोटीत 19 चेंडूत 50 धावांची सर्वात वेगवान भागीदारी केली आहे. यावेळी यशस्वी जयस्वालने 13 चेंडूत 30, तर रोहित शर्माने 6 चेंडूत 19 धावा केल्या. तर एक धाव नो बॉलच्या रुपाने मिळाली.

3 / 6
भारताने 34.4 षटकात 285 धावा केल्या. या धावा करताना प्रत्येक खेळाडूचा स्ट्राईक रेट जबरदस्त होता. भारताने एका डावात 8.2 च्या रनरेटने धावा करण्याचा विक्रमही रचला आहे.

4 / 6
कसोटीत पहिल्यांदा एका ओपनरने अर्थात रोहित शर्माने पहिल्या दोन चेंडूवर षटकार मारले आहेत. पहिल्या षटकासाठी स्ट्राईकला जयस्वाल होता. त्याने सहा चेंडूंचा सामना करत 12 धावा केल्या. दुसऱ्या षटकात रोहित शर्माला स्ट्राईक मिळाली. खलिल अहमदच्या पहिल्या दोन चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकले.

5 / 6
 भारताने एका वर्षात सर्वाधिक 96 षटकार मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. .यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. बेझबॉल रणनितीसह इंग्लंडने 2022 मध्ये 89 षटकार मारले होते. भारताला या वर्षात आणखी कसोटी खेळायच्या आहेत. त्यामुळे हा आकडा 100 च्या पार जाणार हे नक्की आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)

6 / 6
Follow us
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.