IND vs BAN : अश्विनच्या निशाण्यावर 2 महारेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज जोडीला पछाडण्याची संधी

R Ashwin: आर अश्विनने बांग्लादेश विरूद्धच्या सलामीच्या सामन्यात धमाका केला. अश्विनने यासह पहिल्या सामन्यात अनेक विक्रम मोडीत काढले. अश्विनला आता दुसऱ्या सामन्यातही काही रेकॉर्ड ब्रेक करण्याची संघी आहे.

IND vs BAN : अश्विनच्या निशाण्यावर 2 महारेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज जोडीला पछाडण्याची संधी
r ashwin team indiaImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 6:04 PM

भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशला पहिल्या कसोटी सामन्यात 280 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर आता टीम इंडिया बांगलादेशला क्लिन स्वीप करण्यासाठी कानपूरमध्ये जोरदार सराव करत आहेत. उभयसंघातील दुसरा आणि अंतिम सामना हा 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी आर अश्विन याने बॅटिंग आणि बॉलिंगने धमाका केला. अश्विनने शतकी खेळीसह 6 विकेट्स घेतल्या. अश्विनने दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेत दिग्गज शेन वॉर्न याच्या विक्रमाची बरोबरी केली.

अश्विनने दुसऱ्या डावात 21 षटकांमध्ये 88 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या. अश्विनने यासह शेन वॉर्न याच्या कसोटी क्रिकेटमध्ये 37 वेळा 5 विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. आता अश्विनने कानपूर कसोटीत 5 विकेट्स घेतल्यास तो शेन वॉर्न याला मागे टाकेल. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याचा विक्रम हा श्रीलंकेचा दिग्गज मुथैय्या मुरलीथरन याच्या नावावर आहे. मुरलीथरन याने 67 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटीत सर्वाधिक 5 विकेट्स घेणारे गोलंदाज

  1. मुथैय्या मुरलीथरन -67
  2. आर अश्विन – 37
  3. शेन वॉर्न – 37
  4. सर रिचर्ड हेडली -36
  5. अनिल कुंबळे – 35

अश्विनकडे वॉर्नला पछाडण्यासह ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन यालाही मागे टाकण्याची दुहेरी संधी आहे. अश्विनने आतापर्यंत 101 कसोटी सामन्यांमध्ये 522 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनकडे कानपूर कसोटीत 9 विकेट्स घेऊन नॅथन लायन याच्या कसोटी विकेट्सचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. नॅथनने 129 सामन्यांमध्ये 530 विकेट्स घेतल्या आहेत. नॅथन आणि अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत.

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  1. मुथैय्या मुरलीथरन – 800
  2. शेन वॉर्न -708
  3. जेम्स अँडरसन -704
  4. अनिल कुंबळे -619
  5. स्टूअर्ट ब्रॉड – 604
  6. ग्लेन मॅक्ग्रा – 563
  7. नॅथन लायन – 532
  8. आर अश्विन -522

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद नाहिद राणा, महमुदुल हसन जॉय, जाकेर अली, खालेद अहमद, तैजुल इस्लाम आणि नईम हसन.

'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.