IND vs BAN: टीम इंडिया दुसऱ्या कसोटीसाठी कानपूरमध्ये, रोहित-विराटचं खास स्वागत, फोटो व्हायरल
India vs Bangladesh 2nd Test : टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा कानूपरमध्ये होणार आहे. रोहितसेना या सामन्यासाठी कानपूरमध्ये पोहचली आहे. कर्णधार रोहित आणि विराट कोहली या दोघांचं कानपूरमध्ये खास स्वागत करण्यात आलं.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने बांगलादेशवर पहिल्या कसोटी मालिकेतील चौथ्या दिवशी 280 धावांच्या फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसरा आणि अंतिम सामना हा कानपूर ग्रीन पार्क येथे होणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू 24 सप्टेंबर रोजी दुपारी 4च्या दरम्यान विमानतळावर पोहचली. भारतीय संघाच क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या उत्साहात विमानतळावर स्वागत केलं. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती.
भारतीय खेळाडूंचं विमानतळावर खास स्वागत करण्यात आलं. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालून स्वागत केलं गेलं. रोहित आणि विराटचा या माळांसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंडिया-बांगलादेश यांच्यातील दुसरा सामना हा 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. भारतीय खेळाडू विमानतळावरुन हॉटेलच्या दिशेने रवाना झाले. या दरम्यान कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत आणि हेड कोच गौतम गंभीर कॅमेऱ्यात कैद झाले. पंत एकदम बिंधास्तपणे वावरत होता. पंतने 20 महिन्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक केल्यानंतर शतक केलं. त्यामुळे पंतकडून दुसऱ्या सामन्यातही शतकी खेळी अपेक्षित असणार आहे.
दरम्यान या दुसऱ्या सामन्याआधी दोन्ही संघाची सराव सत्राची वेळ ठरली आहे. दोन्ही संघ 25 सप्टेंबरला सराव करणार आहेत. बांगलादेश सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 दरम्यान सराव करेल. तर त्यानंतर टीम इंडिया दुपारी 1.30 ते 4.30 दरम्यान सराव करेल. सराव सत्राचा हा क्रम दुसऱ्या दिवशीही असाच असेल.
दरम्यान टीम इंडिया दुसरा सामना जिंकून बांगलादेशचा 2-0 ने धुव्वा उडवण्यासाठी तयार आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेश या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच घरात 2-0 ने पराभूत केलं होतं. त्यामुळे बांगलादेशला गृहीत धरण्याची चूक टीम इंडिया करणार नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात बांगलादेशची काय रणनिती असणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाचं असं झालं स्वागत
Virat Kohli’s welcome at the team’s hotel in Kanpur. 🇮🇳pic.twitter.com/Fqt7QkNfkX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 24, 2024
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद नाहिद राणा, महमुदुल हसन जॉय, जाकेर अली, खालेद अहमद, तैजुल इस्लाम आणि नईम हसन.