भारताने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या षटकापासून बांगलादेशला दणका दिला. अवघ्या 61 चेंडूत संघाच्या 100 धावा झाल्या. कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात वेगवान धावा आहेत. या विक्रमात सर्वात जबरदस्त खेळी ही डावखुऱ्या यशस्वी जयस्वालने केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये टी20 क्रिकेटचा अनुभूती दिली. त्याच्या फटकेबाजीमुळे उपस्थित प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन झालं. यशस्वी जयस्वालने 31 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 161.29 इतका होता. त्यानंतरही त्याने आपली आक्रमक खेळी सुरुच ठेवली होती. शतक ठोकणार असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. पण त्याचा डाव 72 धावांवर आटोपला. तिथपर्यंत यशस्वीने आपली भूमिका चोखपणे बजावली होती. बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या आहेत. भारताने टी ब्रेकपर्यंत 2 गडी गमवून 138 धाव केल्या आहेत. जर भारताने आजचं 95 धावांची आघाडी मोडून काढली तर विजयाच्या दिशेने पाऊल पडू शकते.
बांगलादेशविरुद्ध यशस्वी जयस्वालने विस्फोटक फलंदाजी केली. या सामन्यात त्याने फक्त 51 चेंडूत 72 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकारही मारले आहेत. पण हसन महमूदच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात फसला आणि त्रिफळा उडाला. वेगवान अर्धशतक करण्याचा मान मात्र मिळाला नाही. पाकिस्तानचा मिस्बाह उल हक याबाबतीच आघाडीवर आहे. तर भारताकडून ऋषभ पंतने 28 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. तर कपिल देवने 30 चेंडूत हा कारनामा केला आहे. शार्दुल ठाकुर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी 31 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे.
दरम्यान, टीम इंडिया एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा संघ ठरला आहे. भारतीय संघाने कसोटी 91 षटकार मारले आहेत. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. बेझबॉल रणनितीसह इंग्लंडने 2022 मध्ये 89 षटकार मारले होते. 2022 मध्ये इंग्लंडने भारताचा विक्रम मोडीत काढला होता. 87 षटकारांसह हा विक्रम 2021 मध्ये भारताच्या नावावर होता. मात्र आता पुन्हा एकदा भारताने अव्वल स्थान पटकावलं आहे.