IND vs BAN : तिसऱ्या सामन्यात बदल निश्चित, प्रशिक्षकानेच सांगितलं, गंभीरच्या लाडक्याचं पदार्पण!
Ind vs Ban 3rd T20I Playing XI: टीम इंडियाने सलग 2 सामन्यांमध्ये प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. मात्र टीम इंडियाने मालिका जिंकल्याने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात बदल होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
बांगलादेश क्रिकेट टीमच्या भारत दौऱ्याची सांगता ही हैदराबादमधील तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्याने होणार आहे. बांगलादेशने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर टी 20i मालिकाही गमावली आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या टी20i सीरिजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये 12 ऑक्टोबरमध्ये होणार आहे. टीम इंडियाने आधीच मालिका जिंकली असल्याने तिसऱ्या सामन्यात काही खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. याबाबत टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डेस्काटे यांनी माहिती दिली आहे. डेस्काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार हेड कोच गौतम गंभीर याचा लाडका हर्षीत राणा याला संधी मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे.
हर्षित राणा याने आयपीएलच्या 17 व्या मोसमात केकेआरसाठी उल्लेखनीय कामगिरी केली. गंभीरच्या मार्गदर्शनात केकेआरने 12 वर्षानंतर आयपीएल ट्रॉफी उंचावली. आता गंभीर टीम इंडियाचा कोच आहे. त्यात हर्षीतची भारतीय संघात निवड झाली आहे. हर्षीतला श्रीलंका दौऱ्यापासून पदार्पणाची संधी आहे. मात्र आता हर्षीतची प्रतिक्षा संपणार असल्याने संकेत डेस्काटे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत.
डेस्काटे काय म्हणाले?
“टीम इंडियात फार खोली आहे. आमच्या अनेक खेळाडूंकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. आमचा बहुतांश खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हर्षीत राणा याच्यासारखे खेळाडू प्रतिक्षेत आहेत. तसेच तिलक वर्मा शिवम दुबे याच्या दुखापतीमुळे विलंबाने संघात सहभागी झाला. तर जितेश शर्मालाही या मालिकेत संधी मिळालेली नाही. आधी मालिका त्यानंतर इतर खेळाडूंना संधी द्यायची अशी आमची योजना होती”, असं डेस्काटे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, जितेश शर्मा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि हर्षित राणा.
बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तनजीद हसन, रकीबुल हसन आणि तंजीम हसन साकिब.