IND vs BAN | बांगलादेशकडून गोलंदाजाची धुलाई, टीम इंडियाला 266 रन्सचं टार्गेट
India vs Bangladesh Asia Cup 2023 Super 4 | बांगलादेशने तडाखेदार बॅटिंग करत टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. बांगलादेशने या जोरावर 250 पेक्षा अधिक धावा केल्या.
कोलंबो | बांगलादेश क्रिकेट टीमने टीम इंडियाला विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलंय. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 265 धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून कॅप्टन शाकीब अल हसन याने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. तर तॉहीद हृदाय याने अर्धशतकी खेळी केली. तर अखेरीस नसुम अहमद, मेहदी हसन आणि तांझिम हुसेन शाकीब या दोघांनी फिनिशिंग टच दिला. बांगलादेशने या जोरावर 250 पार मजल मारली.
बांगलादेशची बॅटिंग
बांगलादेशकडून शाकीबने 85 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. तॉहीद हृदाय याने 81 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 खणखणीत सिक्सच्या मदतीने 54 रन्स केल्या. नसुम अहमद याने 45 बॉलमध्ये 44 धावा केल्या. तांझीद हसन आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. लिटॉन दास झिरोवर आऊट झाला. अनामुल 4 रन करुन माघारी परतला. शमीम होसेन याने 1 धाव केली.
तर मेहदी हसन आणि तांझिम हसन शाकिन या दोघांनी अखेरीस छोटेखानी पण निर्णायक खेळी केली. मेहदी हसन याने 23 बॉलमध्ये नाबाद 29 धावा केल्या. तर तांझिम हसन शाकीब याने 8 बॉलमध्ये नॉट आऊट 14 रन्स केल्या.
शाकीबचा टीम इंडियाला बॅटने चोप
Asia Cup 2023: Bangladesh 🆚 India | Super Four (D/N) 🏏 India need 266 Runs to Win#BCB | #AsiaCup | #BANvIND pic.twitter.com/ZZfGwilBmi
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 15, 2023
तर टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मात्र शार्दुल महागडा ठरला. शार्दुलने 10 ओव्हरमध्ये 65 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी याने 8 ओव्हरमध्ये 32 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर प्रसिध कृष्णा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा याने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास (विकेटकीपर), तांझिद हसन, अनमूल हक, तॉहिद हृदॉय, शमीम होसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तांझिम हसन शाकिब आणि मु्स्तफिजुर रहीम.