IND vs BAN | बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या ‘या’ तिघांना विश्रांती!
Team India vs Bangladesh Asia Cup 2023 | टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात आशिया कप सुपर 4 मधील शेवटचा सामना हा आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
कोलंबो | आशिया कप 2023 सुपर 4 फेरीतील सहावा आणि शेवटचा सामना हा शुक्रवारी 15 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. बांगलादेश आणि टीम इंडियासाठी हा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. कारण टीम इंडियाने श्रीलंकेला 12 तारखेला पराभूत करत आशिया कप फायनलमध्ये धडक दिली. तर श्रीलंकेच्या पराभवामुळे बांगलादेशचं सुपर 4 मधील आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे हा सामना इतका महत्त्वाचा नसेल. मात्र आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघ आपल्या टीममध्ये इतर खेळाडूंना संधी देण्याचा प्रयोग करु शकतात.
टीम इंडियात बदल निश्चित!
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले जाणार आहेत. बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांनीच याबाबतचे संकेत दिले आहेत. टीम इंडिया-बांगलादेश सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत म्हाम्ब्रे यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याबाबतचा निर्णय हा कॅप्टन रोहित शर्मा हेड कोच राहुल द्रविड यांच्याशी बातचीत केल्यानंतरच होईल, असंही म्हाम्ब्रे यांनी स्पष्ट केलं.
प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 बदल
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले जाऊ शकतात. त्यानुसार सूर्युकमार यादव, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज या तिघांची एन्ट्री होईल. तर केएल राहुल, अक्षर पटेल आणि मोहम्मद शमी या तिघांना विश्रांती दिली जाऊ शकते.
आशिया कप 2023 साठी बांगलादेश टीम | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभावित प्लेईग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.