IND vs BAN : टीम इंडिया विरूद्धच्या टी20i मालिकेसाठी बांगलादेशची घोषणा, कुणाला मिळाली संधी?
India vs Bangladesh T20I Series: कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया-बांगलादेश यांच्यात टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात सध्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना कानपूर येथे खेळवण्यात येत आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्याची टी 20I मालिका होणार आहे. बीसीसीआयने 28 सप्टेंबर रोजी या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर मयंक यादव याला पहिल्यांदाच संधी दिली गेली आहे. बीसीसीआयनंतर आता 24 तासांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टी 20I सीरिजसाठी संघ जाहीर केला आहे.
नजमुल हुसेन शांतो बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. शांतोच्या नेतृत्वात बांगलादेशने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सुपर 8 पर्यंत मजल मारली होती. तर ऑलराउंडर शाकिब अल हसन याने कसोटीसह टी 20I क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे शाकिबच्या जागी मेहदी हसन मिराज याला संधी देण्यात आली आहे. मेहदीचं 1 वर्षाने टी 20I संघात पुनरागमन झालं आहे. सौम्य सरकार याला टी 20I वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर वगळण्यात आलं आहे. तर परवेज हुसेन इमोन आणि रकीबुल हसन या दोघांचं पुनरागमन झालं आहे.
टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 6 ऑक्टोबर, ग्वाल्हेर
दुसरा सामना, 9 ऑक्टोबर, नवी दिल्ली
तिसरा सामना, 12 ऑक्टोबर, हैदराबाद
टी 20i सीरिजसाठी बांगलादेश संघ जाहीर
Bangladesh have recalled Mehidy Hasan Miraz to the T20I squad for the three-match series against India 🔙
🔗 https://t.co/GlaBVb895M | #INDvBAN pic.twitter.com/DzcELukRI3
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 29, 2024
बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.