IND vs BAN : इंडिया-बांग्लादेश दुसऱ्या टी 20I सामन्याआधी टीमला झटका, दिग्गजाचा निवृत्तीचा निर्णय

India vs Bangladesh T20i Series : टीम इंडिया बांगलादेश विरूद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशात दुसऱ्या सामन्याआधी दिग्गज ऑलराउंडरने निवृ्त्ती जाहीर करत संघाला झटका दिला आहे.

IND vs BAN : इंडिया-बांग्लादेश दुसऱ्या टी 20I सामन्याआधी टीमला झटका, दिग्गजाचा निवृत्तीचा निर्णय
Hardik Pandya and MahmudullahImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 8:16 PM

टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा 9 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार सराव कराव केला आहे. टीम इंडिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर असल्याने दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर बांगलादेशसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. अशात बांग्लादेशला मोठा झटका लागला आहे. स्टार ऑलराउंडर शाकिब अल हसन याच्यानंतर आता महमुदुल्लाह याने निवृत्ती जाहीर करत बांगलादेशला मोठा झटका दिला आहे. महमुदुल्लाह याने दुसऱ्या टी 20i सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत निवृत्तीबाबतचा आपला निर्णय जाहीर केला.

महमुदुल्लाह काय म्हणाला?

“हो, मी या मालिकेनंतर टी 20i क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. निवृत्त व्हायचं हे आधीपासून निश्चित होतं. टी20i क्रिकेटला सोडण्याची हीच योग्य वेळ आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटकडे आता लक्ष केंद्रीत करणार आहे”,असं महमदुल्लाह याने सांगितलं.

महमूदुल्लाह बांगलादेशच्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. महमूदुल्लाहने 17 वर्षांनंतर टी 20i क्रिकेटमधील प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशसाठी महिन्याभरातला हा दुसरा झटका आहे. महमूदुल्लाह याच्याआधी शाकिब अल हसन यानेही कसोटी आणि टी 20i क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बांगलादेशने टी 20i क्रिकेटकमधून 2 अनुभवी शिलेदार गमावले आहेत. तर महमूदुल्लाह याने 2021 मध्येच कसोटी क्रिकेटमधू निवृत्ती घेतली आहे.

महमूदुल्लाहकडून टी 20i निवृत्ती जाहीर 

महमूदुल्लाहची टी 20i कारकीर्द

दरम्यान महमूदुल्लाहने 2007 साली केन्या विरुद्ध टी 20i पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत महमूदुल्लाह खेळतोय. महमूदुल्लाह टी 20i क्रिकेटमध्ये इतकी वर्ष खेळणारा तिसरा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. महमूदुल्लाह याच्याआधी शाकिब अल हसन आणि सीन विलियम्स या दोघांनी सर्वाधिक काळ टी20i क्रिकेट खेळलं आहे. महमूदुल्लाहने त्याच्या टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 117.74 च्या स्ट्राईक रेटने 2 हजार 395 धावा केल्या आहेत. तसेच 40 विकेट्सही घेतल्या आहेत. आता बांगलादेशचा टीम इंडिया विरुद्धची मालिका जिंकून महमूदुल्लाहला विजयी निरोप देण्याचा प्रयत्न असणार आहे.

'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.