ind vs ban : यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहकडून बांगलादेशचा खेळाडू ‘चीतपट’, व्हिडीओ एकदा पाहाच

jasprit Bumrah bold : भारताचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह याने गोळीच्या स्पीडने यॉर्कर बॉल टाकला. बांगलादेशच्या खेळाडूच्या पापण्या लवण्याच्या आतच त्याचा दांड्या गुल झा्ल्या. बुमराहचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ind vs ban : यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहकडून बांगलादेशचा खेळाडू 'चीतपट', व्हिडीओ एकदा पाहाच
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 10:31 AM

मुंबई : भारत आणि बांगलादेशमधील सामन्यामध्ये भारतीय संघाने सात विकेटने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये सलग चौथा विजय मिळवला आहे. बांगलादेश संघाच्या 257 धावांचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहली याने नाबाद 103 धावांची शतकी खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. याआधी सर्व गोलंदाजांनी दर्जेदार गोलंदाजी करत बांगलादेशचा डाव 250 च्या जवळपास गुंडाळला होता. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने शेवटच्या ओव्हरमध्ये बांगलादेशचा मुख्य फलंदाज असलेल्या खेळाडूला कडक यॉर्कर टाकत आऊट केलं.

पाहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

बांगलादेश संघाचे मुख्य फलंदाज बाद झाल्यावर महमुदुल्ला याने एकट्याने एक बाजू लावून धरली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये महमुदुल्ला बुमराहरला कसा डिफेंड करतो हे पाहायचं होतं. मात्र बुमराहने दुसऱ्याच चेंडूवर त्याच्या दांड्या उखडून टाकल्या. बांगलादेशविरुद्ध त्याने 10 ओव्हरमध्ये 41 धावा देत दोन विकेट घेतल्या.

दरम्यान, आतापर्यंत बुमराहने चार सामन्यांनध्ये एकूण 10 विकेट्स घेतल्या आहेत. यामधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन तर अफगाणिस्तानविरूद्ध चार आणि पाकिस्तानविरूद्धही दोन विकेट त्याने घेतल्या होत्या. बुमराह एक दोन विकेट घेत असला तरी तो धावांवर अंकुश आणि विरोधी संघाच्या खेळाडूंवर चांगला दबाव टाकतो.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद,  नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम

वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.