Virat Kohli याच्या शतकासाठी त्याग, केएल राहुल याचा दिलदारपणा
Virat Kohli And K L Rahul | विराट कोहली याला शतक पूर्ण करण्यात केएल राहुल याने पुरेपुर मदत केली. केएलच्या पाठिंब्याशिवाय विराटला शतक करता आलं नसतं. केएलच्या या वृत्तीचं सोशल मीडियावर कौतुक होतंय
पुणे | टीम इंडियाने बांगलादेशचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत वर्ल्ड कप 2023 मधील सलग चौथा विजय साजरा केला. टीम इंडियाला विजयासाठी बांगलादेशने 257 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. टीम इंडियाच्या विजयात सर्वच खेळाडूंनी योगदान दिलं. मात्र विराट कोहली याचं इतरांपेक्षा अधिक योगदान राहिलं. विराटने सिक्स मारत शतक पूर्ण केलं. विराटच्या या षटकारासह टीम इंडियाचा विजयही झाला. टीम इंडियाने 51 बॉलआधी हे आव्हान पूर्ण केलं. विराटने बागंलदेश विरुद्ध 103 धावांची नाबाद शतकी खेळी केली. विराटचं हे वर्ल्ड कपमधील चेजिंग करताना पहिलं आणि बांगलादेश विरुद्धचं दुसरं शतक ठरलं. विराटच्या या शतकाचा खरा सूत्रधार हा केएल राहुल ठरला. केएलने दाखवलेल्या दिलदारपणामुळे विराट 48 वं एकदिवसीय शतक पूर्ण करु शकला.
विराटच्या शतकात केएलचं योगदान
शुबमन गिल आणि रोहित शर्मा या दोघांनी 12.4 ओव्हरमध्ये 88 धावांची सलामी भागीदारी केली. रोगित 48 धावा करुन आऊट झाला. विराट मैदानात आला तेव्हा टीम इंडियाला विजयासाठी 169 धावांची गरज होती. विराट आणि शुबमन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 44 धावा जोडल्या. शुबमन 53 धावांची खेळी करुन माघारी परतला. श्रेयस अय्यर 19 धावांवर आऊट झाला. श्रेयसनंतर केएल मैदानात आला. तोवर इथे किंग विराट टोटली सेट झाला होता. सामना अखेरच्या टप्प्यात पोहचला होता. विराट 74 धावांवर खेळत होता. तर दुसऱ्या बाजूने चांगली साथ देत होता.
विराटच्या शतकाचा टर्निंग पॉइंट
टीम इंडियाला मोजून 26 धावांची गरज होती. म्हणजे विराटला शतकासाठी जितक्या धावा हव्या होत्या तितक्याच टीम इंडियाला विजयासाठी. अशा परिस्थितीत विराटचं शतक होणं तसं अवघडच वाटत होतं. मात्र केएलमुळे अवघड ते शक्य झालं. केएलने एकही धाव घेतली असती तर विराटच्या शतकाचं समीकरण फिस्टकलं असतं. मात्र केएलने तसं होऊ दिलं नाही. केएलच्या त्यागामुळेच विराटने अखेरच्या 26 धावा करत शतक ठोकलं आणि टीम इंडियाला विजयी केलं. विराटने शतकासाठी आणि टीम इंडियाच्या विजयासाठी 26 धावांची गरज असताना अनुक्रमे 6, 1, 4, 0, 0, 6, 0, 1, 0, wd, 2, 0, 2, 0, 1, 0, 0 आणि 6 अशा धावा केल्या. केएलने या दरम्यान एकदाही सिंगल किंवा डबल घेण्याचा प्रयत्न केला नाही.
केएल सामन्यानंतर काय म्हणाला?
केएलने विराटच्या शतकासाठी सिंगल-डबल धावून घेण्यासाठी नकार दिला.या दरम्यान विराटने सिंगल-डबल न घेतल्यास लोकं मला स्वार्थी समजतील, हा वैयक्तिक विक्रमासाठी खेळतो असं म्हणतील. मात्र मी म्हटलं की आपण आरामात जिंकुन. तु तुझं शतक पूर्ण कर असं मी म्हटलं”, असं केएलने सामन्यानंतर सांगितलं.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), लिटॉन दास, तंझिद हसन, मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान आणि शरीफुल इस्लाम.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.