IND vs BAN : वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंत की संजू सॅमसन! रोहित शर्मासाठी निवडणं झालं सोपं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची सराव सामन्यातून चाचपणी झाली. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यातून पुढच्या प्लेइंग इलेव्हनची निवड करणं सोपं होणार आहे. खरं तर रोहित . संघात संजू सॅमसन की ऋषभ पंतला जागा द्यायची हे आता रोहित शर्मासाठी सोपं झालं आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना सुरु आहे. या सराव सामन्यातून पुढच्या खेळीची आणि वातावरणाची संघाला सवय होईल. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशचा संघ अमेरिकेत आहेत. अमेरिकेने बांगलादेशला टी20 मालिकेत पराभूत केलं. असं असलं तर बांगलादेशला या मातीचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे बांगलादेशसोबतचा सराव सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. कर्णधार रोहित शर्मा याने तात्काळ फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रोहित शर्माने सांगितलं की, “आम्ही प्रथम फलंदाजी करू. यामागे ठोस असं काही कारण नाही. इकडची परिस्थिती आव्हानात्मक आहे. विराट कोहली कालच आला आहे. त्यामुळे तो या सामन्यात नाही. पण बाकी सर्व खेळाडू सज्ज आहेत. आता त्यांचा कसा वापर करायचा हे सामन्यात पाहू. आम्ही लवकर आलो. त्यामुळे शरीराचं घड्याळ जुळून आलं आहे. आम्ही या परिस्थितीचा अंदाज घेऊन चांगली कामगिरी करू.”
भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 182 धावा केल्या आणि 183 धावा जिंकण्यासाठी दिल्या. या सामन्यात रोहित शर्मा आणि संजू सॅमसन यांनी सुरुवात केली. यशस्वी जयस्वालचा आयपीएलमधील फॉर्म पाहता हे कॉम्बिनेशन मैदानात उतरवलं असावा असा अंदाज आहे. पण येथे संजू सॅमसन काही खास करू शकला नाही. संजू सॅमसनने 6 चेंडूचा सामना केला आणि अवघी 1 धाव करून तंबूत परतला. शोरिफुल इस्लामच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्या उलट ऋषभ पंतची बॅट चांगलीच तळपली. त्याने 32 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 धााव केल्या. त्यामुळे संजू सॅमसनपेक्षा ऋषभ पंत उजवा ठरला आहे. तसेच यशस्वी जयस्वाल प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यासाठी कारणंही मिळालं आहे. आता आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन की यशस्वी जयस्वालला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
बांगलादेश (फलंदाजी 11, क्षेत्ररक्षण 11): लिटन दास, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहिद हृदयॉय, शकीब अल हसन, महमुदुल्लाह, जाकेर अली (विकेटकीपर), महेदी हसन, रिशाद हुसेन, शोरीफुल इस्लाम, तनजीद हसन, तन्झीम हसन साकीब, तन्वीर इस्लाम.
भारत (फलंदाजी 11, क्षेत्ररक्षण 11): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज , अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल