Video : शार्दुल ठाकुरला मिळणार होती संधी पण श्रेयस अय्यरने केला घोळ, रोहित शर्माचा त्या प्लानबाबत खुलासा

IND vs BAN : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला. पण या सामन्यातील उणीधुणी अजूनही सुरुच आहेत. आता रोहित शर्मा याने एका प्लानचा खुलासा केला आहे. चला जाणून घेऊयात याबाबत

Video : शार्दुल ठाकुरला मिळणार होती संधी पण श्रेयस अय्यरने केला घोळ, रोहित शर्माचा त्या प्लानबाबत खुलासा
Video : शार्दुल ठाकुरची संधी श्रेयस अय्यरने हिरावून घेतली! रोहित शर्माने शुबमन गिलच्या तोंडावरच सांगून टाकलं
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 7:40 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडिया 12 वर्षांचा दुष्काळ संपवणार का? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडला आहे. दुसरीकडे, टीम इंडियाची विजयी वाटचाल सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या चार पैकी चार सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. बांगलादेश विरुद्धचा सामना टीम इंडियाने सहज जिंकला. बांगलादेशने 50 षटकात 8 गडी गमवून 256 धावा केल्या आणि विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने हे आव्हान 7 गडी राखून 41.3 षटकात पूर्ण केलं. पण या सामन्याची चर्चा अजूनही रंगलेली आहे. मग ते विराट कोहलीचं शतक असो, वाइड बॉल असो की रोहित शर्माचा चुकीचा फटका. आता कर्णधार रोहित शर्मा याने शार्दुल ठाकुरबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. शुबमन गिल याने शार्दुल ठाकुरबाबत एक प्रश्न विचारला. त्यावर रोहित शर्मान प्लान काय होता? आणि कसा फिस्कटला याबाबत सांगितलं आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

शुबमन गिलने विचारलं की, केएल राहुलच्या जागी शार्दुल ठाकुरला फलंदाजीला पाठवणार होता? त्याचं काय झालं? त्यावर रोहित शर्मा याने उत्तर दिलं की, “त्याच चेंडूवर तो आउट झाला. त्याच चेंडूवर मी शार्दुलला सांगितलं होतं की तू जाशील आता. पण त्याच चेंडूवर श्रेयस अय्यर बाद झाला.” मग शुबमन गिलने सांगितलं यामुळे फॅन्स नाराज झाले, त्याचे हिटिंग वगैरे बघता आले नाही. तेव्हा रोहित शर्मा म्हणाला की, ‘शार्दुल ठाकुर मोठ्या मॅचचा प्लेयर आहे. तुम्हाला नक्कीच त्याला बघायला मिळेल.’

रोहित शर्मा आणि शुबमन गिल याने पहिल्या गड्यासाठी 88 धावांची भागीदारी केली. पण हसन महमुदच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारताना बाद झाला. 48 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर संघाच्या 132 धावा असताना शुबमन गिल 53 धावा करून बाद झाला. त्यानंतर मैदानात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांची जोडी जमली दोघांनी 46 धावांची भागीदारी केली होती. 30 वं षटक सुरु होणार होतं, तेव्हाच त्याने शार्दुलला सांगितलं तयार राहा. पण पहिल्याच चेंडूवर श्रेयस बाद झाला. मग केएल राहुलला पाठवावं लागलं.

हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने पाचव्या गोलंदाजाची जबाबदारी शार्दुल ठाकरुलच्या खांद्यावर पडली. त्याने 9 षटकात 59 धावा देत 1 गडी बाद केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.