Video : शुबमन गिल याने तो प्रश्न विचारताच रोहित शर्मा संतापला, मग कंट्रोल करत सांगितलं आपलं दु:ख
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने आखलेले प्लान योग्य रितीने काम करत आहेत. त्यामुळे संघाला सलग चार सामन्यात विजय मिळाला. दुसरीकडे, बांगलादेश विरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा चांगलाच वैतागला.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा आत्मविश्वास जबरदस्त दुणावलेला आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे. या स्पर्धेत सर्वच खेळाडू जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन करत आहेत. एक बाजू ढासळली तर दुसऱ्या बाजून डाव सावरला जात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात हे चित्र पाहायला मिळालं. दुसरीकडे, आयसीसी स्पर्धांमध्ये कायमच बांगलादेशचा अडसर पाहायला मिळाला आहे. एखादी चूक चांगलीच महागात पडू शकते याचा अंदाज यापूर्वी आला आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात अशीच चूक कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून झाली. चुकीचा फटका मारून तंबूत परतावं लागलं. इतकंच काय तर अर्धशतकही दोन धावांनी हुकलं. वाईट पद्धतीने बाद झाल्याचं दु:ख रोहित शर्मा याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. ड्रेसिंग रुममध्येही त्याला असं बाद होणं सळत असल्याचं पाहिलं गेलं. यावर शुबमन गिल याने रोहित शर्माला प्रश्न विचारला.
शुबमन गिलने घेतली रोहितची फिरकी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने शतक ठोकलं होतं. त्यामुळे या सामन्यातही रोहितकडून फार अपेक्षा होत्या. रोहितचा आक्रमक अंदाज पाहून शतक ठोकेल याबाबत खात्री होती. पण आवडता पुल शॉट चुकीच्या पद्धतीने मारल्याने आउट झाला आणि रोहित चांगलाच संतापला. त्याच्या चेहऱ्यावरचं दु:ख सर्वांनीच पाहिलं. सामना संपल्यानंतर शुबमन गिलने विचारलं की, बाद झाल्यानंतर कसं वाटलं?
Dressing room banter 😉Shardul Thakur's potential batting promotion 👌Mohd. Siraj's celebration 😎
Presenting post-match shenanigans ft. Shubman Gill 👌👌 – By @28anand
WATCH 🎥🔽 #CWC23 | #TeamIndia | #INDvBANhttps://t.co/Uzq6h9VLYs
— BCCI (@BCCI) October 20, 2023
शुबमन गिल याने असा प्रश्न विचारताच रोहित शर्मा संतापला. मग त्याने स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. ‘हो रे तो शॉट खाली खेळण्याऐवजी वर खेळायला हवा होता. म्हणजे आरामात षटकार मिळाला असता.’ त्यानंतर शुबमन गिल याने पुढच्या सामन्याबाबत प्रश्न विचारला. पुढचा सामना न्यूझीलंडसोबत आहे आणि 2003 पासून भारत जिंकलेला नाही. पुढच्या सामन्यात जिंकणार का?
“आम्ही पक्कं जिंकणार असं क्रिकेट खेळत नाही. मैदानात पोहोचल्यानंतर आम्ही टीम म्हणून योग्य ते करू.भुतकाळात तसं घडलं आहे हे आम्ही टाळू शकत नाही. बघुयात पुढे..”, असं रोहित शर्मा म्हणाला.